Home लेख आईवडिलांनी पाजले संगीताचे बाळकडू! (मायकेल जॅक्सन स्मृतिदिन.)

आईवडिलांनी पाजले संगीताचे बाळकडू! (मायकेल जॅक्सन स्मृतिदिन.)

219

 

_मृत्यूपश्चात देखील मायकेल जॅक्सनच्या ध्वनिफितींची विक्री, शिफारशी आणि मैफलींतून त्यांना मिळणारे वार्षिक मानधन सन १९८९मध्ये सुमारे १२५ दशलक्ष डॉलर्स होते. ऑगस्ट २०१८मध्ये फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार त्यांची एकूण कमाई ४.२ अब्ज डॉलर्स झाली होती. सन २०१६मध्ये जॅक्सन इस्टेटकडून वार्षिक एकूण कमाईची अंदाजे किंमत ८२५ दशलक्ष डॉलर्स इतकी होती, त्यामुळे सन २०१९मध्ये फोर्ब्सने जॅक्सनना सन २०१२ वगळता प्रत्येक वर्षी जगातील अव्वल कमाई करणारा मृत कलाकार म्हणून मान्यता दिली. सदर माहितीपूर्ण लेख श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी प्रस्तुत करताहेत… संपादक._

मायकल जॅक्सन हे एक जगप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक, गीतकार आणि नर्तक. किंग ऑफ पॉप याबरोबरच द ग्लोव्ह वन, वॉको जॅको, एमजे, जॅको, मिकी माईक, ऍपलहेड, स्मिली अशा अनेक टोपणनावानेही ते प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म अमेरिकेतील शिकागोजवळील इंडियाना येथील गॅरी या गावात झाला. जॅक्सन स्ट्रीटवर एका श्रमिक वर्गातील आफ्रिकन-अमेरिकन कुटुंबामध्ये जन्मलेले मायकल हे जॅक्सन कुटुंबातील दहा मुलांपैकी आठवे मुलगे होते. त्यांना रेबी, लातोया आणि जेनेट या तीन बहिणी आणि जॅकी, टीटो, जर्माइन, मार्लन आणि रँडी हे पाच भाऊ. त्यांची आई कॅथरीन एस्तेर जॅक्सन या क्लॅरिनेट आणि पियानो वाजवत असत. त्यांचे वडील जोसेफ हे निवृत्त मुष्टियोद्धा होते. चरितार्थाकरिता ते क्रेन ऑपरेटरचे काम करीत. तसेच स्थानिक रिदम अँड ब्लूज बँडमध्ये गिटार वाजवित असत. जोसेफ आणि त्यांचे भाऊ ल्यूथर यांनी इतर सहकाऱ्यांसमवेत द फॅल्कन्स नावाचा बँड काढला. काही कालावधीनंतर तो बंद पडला; पण त्यांच्या गाण्याच्या तालमींमुळे या मुलांच्या मनात गायन, वादन यांबद्दल आकर्षण निर्माण झाले व त्यांचे संगीताचे उपजत कलागुण हळूहळू वाढीस लागले. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना घरीच संगीताचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या वडिलांनी या भावंडांना गायन, नृत्य, प्रत्यक्ष रंगमंचावर कसे वावरावे, सादरीकरण कसे करावे यांचे प्रशिक्षण दिले; पण याचबरोबर या सर्व भावंडांचे बालपण त्यांच्या वडिलांच्या विक्षिप्त स्वभावामुळे अतिशय खडतर परिस्थितीतही गेले. यामुळे बहुतांशी मुलांचा स्वभाव विशेषत: मायकल यांचा स्वभाव काही प्रमाणात मनस्वी बनला.
दि.२९ ऑगस्ट १९५८ रोजी शिकागो नजीक एका लहानश्या गावात मायकल जैक्सनचा जन्म झाला. आफ्रिकन-अमेरिकन कामगारवर्गाच्या कुटुंबात जन्मलेला तो जोसेफ वॉल्टर- जो जॅक्सन आणि कॅथरीन एथर स्क्रूज यांचा दहा मुलांपैकी आठवा होता. त्यांचे वडील स्टील गिरणी कामगार म्हणून काम करत असत, त्याची आई एक प्रामाणिक यहोवाची साक्षीदार होती. केथरीन या मायकलच्या आईला संगीताची फार आवड होती, मायकलला संगीताच्या आवडीचे बाळकडू हे घरातूनच मिळत गेले. अगदी लहानपणापासूनच ते संगीतप्रेमी होते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मायकल आणि त्यांची चार भावंडे मिळून जॅक्सन ब्रदर्स या नावाने संगीताचे कार्यक्रम करीत होती. त्यावेळी मायकल १० वर्षांचे होते. तत्कालीन तरुणांना आकर्षक वाटणारी दिलखेचक वेशभूषा आणि वेगळी केशभूषा- अफ्रोस- केसांची डोक्यावर गुच्छासारखी असणारी रचना, त्वेषाने आणि वेगवान हालचालींनी भरलेले नृत्य या वैशिष्ट्यांसह तरुण आणि उत्साही मंडळींनी भरलेला असा हा समूह अल्पावधीतच खूप यशस्वी झाला. पुढे त्यांच्या बँडचे नामकरण जॅक्सन-५ असे करण्यात आले. ऑगस्ट १९६७मध्ये हार्लेम येथील सुप्रसिद्ध अपोलो थिएटरमध्ये त्यांना कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. तेथील अमॅच्युअर शो या कार्यक्रमात भाग घेण्यास मिळणे, ही कलाकारांसाठी एक पर्वणी असायची. तेथील कार्यक्रमामुळे या बंधूंनाही प्रसिद्ध कलाकार म्हणून मान्यता मिळाली. स्टीलटाउन या संस्थेच्या नावाखाली पहिल्यांदा या बँडची बिग बॉय बॅक्ड विथ यू हॅव चेंज आणि वी डोन्ट हॅव टू बी ओव्हर २१ टू फॉल इन लव्ह, बॅक्ड विथ जॅम सेशन ही दोन गाणी ध्वनिमुद्रित झाली. यानंतर काही कालावधीतच अमेरिकेतील एक प्रसिद्ध ध्वनिमुद्रिका संस्था मोटाऊन रेकॉर्ड्स या संस्थेचे अध्यक्ष ज्युनिअर बेरी गॉर्डी यांनी या बँडबरोबर मोठ्या रकमेचा करार केला- १९६८. या संस्थेबरोबर जॅक्सन-५ यांनी आय वाँट यू बॅक, एबीसी, द लव्ह यू सेव्ह, आय विल बी देअर, ममाज पर्ल, नेव्हर कॅन से गुडबाय, मेबी टुमॉरो या अत्यंत यशस्वी ध्वनिमुद्रिका केल्या. आय वाँट यू बॅक हे या संस्थेबरोबरचे त्यांचे पहिलेच गाणे अतिशय लोकप्रिय झाले. अमेरिकेतील बिलबोर्ड्स टॉप १००- अमेरिकेतील सर्वांत लोकप्रिय ध्वनिमुद्रिका आणि गीतांची क्रमवारी प्रसिद्ध करणारे मान्यताप्राप्त साप्ताहिक या संगीत मानांकनात हे गाणे पहिल्या क्रमांकावर गेले. अमेरिकेत या गाण्याच्या संग्रहाच्या जवळपास वीस लक्ष आणि अमेरिकेबाहेर चार लक्ष प्रतींची तडाखेबंद विक्री झाली. पुढच्या एबीसी या संग्रहाच्या बावीस लक्ष प्रतींची विक्री झाली.
मायकल जॅक्सन त्यांच्या नवीन कार्यक्रमाच्या तयारीत असताना त्यांना जोरात हृदयविकाराचा झटका आला. वयाच्या ५० व्या वर्षी अमरिकेतील कॅलिफोर्निया येथे हृदयक्रिया बंद पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अतिरिक्त औषधांच्या सेवनामुळेही त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा, असे निदान करण्यात आले होते. मायकल जॅक्सन यांच्या जीवनावर आधारित विविध चित्रपट आणि माहितीपट तयार करण्यात आले आहेत. यामध्ये द विझ-१९७८, मायकल जॅक्सन थ्रिलर-१९८३, मेकिंग ऑफ मायकल-१९८३, मायकल जॅक्सन द लिजेंट-१९८८, कॅप्टन इ ओ-१९८६, मायकल जॅक्सन वन नाईट-१९९५, मायकल जॅक्सन नंबर वन्स-२००३, मिस कास्ट अवे आणि द आयलँड गर्ल्स-२००४, द वन-२००४, मायकल जॅक्सन अनमास्क्ड-२००९, मायकल जॅक्सन दिस इज इट-२००९, मायकल जॅक्सन व्हिजन-२०१०, बॅड २५-२०१२, मायकल जॅक्सन द लास्ट फोटो शूट-२०१४ इत्यादींचा समावेश आहे.
जगाला विद्युत शाॅक देणारा दिवस म्हणजे दि.२५ जून २००९ रोजी लॉस एंजेलिस येथे दुपारी २:२६ वा. अचानक दूरचित्र वाहिन्यांवर वृत्त झळकायला लागलं. मायकेल जॅक्सन यांचं निधन!.. अनेकांसाठी तो खूप मोठा धक्का होता. या धक्क्यानं अमेरिकेत अनेक लोक रस्त्यावरच बेशुद्ध पडले. काही मिनिटांतच सोशल मीडिया वेबसाईट्स क्रॅश झाल्या. नैराश्यात गेल्यानं १३ जणांनी आत्महत्या केली! सुसाईड प्रिव्हेन्शन हॉटलाइनवरही जगभरात शेकडो कॉल आले. हॉटलाइनवर असलेल्या तज्ज्ञांनी त्यांना कसंबसं आत्महत्येपासून परावृत्त केलं. त्यांच्याभोवती असलेलं प्रसिद्धीचं आणि गूढतेचं वलय त्याच्या मृत्यूनंतरही कायम होतं. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला, तो दिवस तर त्याचे चाहते आजही विसरलेले नाहीत.
!! या लेखप्रपंचातून पाॅप गायक मायकेल जॅक्सन यांना स्मृतिदिनानिमित्त करोडो विनम्र अभिवादन !!


– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी,
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here