Home यवतमाळ जागतिक योग दिन (आंतरराष्ट्रीय योग दिवस) साजरा

जागतिक योग दिन (आंतरराष्ट्रीय योग दिवस) साजरा

133

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 23 जून) पतंजली योग समिती व नगरपरिषद उमरखेड च्या वतीने स्थानिक स्वर्गीय अनंतराव देवसरकर सांस्कृतिक भवन ढाणकी रोड या ठिकाणी आज जागतिक योग दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे पतंजली योग समिती व नगर परिषद उमरखेड च्या वतीने जागतिक योग दिनाच्या निमित्ताने तीन दिवसीय शिबिराचे आयोजन याच सांस्कृतिक हॉलमध्ये करण्यात आले होते सर्वांचे आरोग्य निरोगी व आनंदी राहावी यासाठी 21 जून हा जागतिक योग दिन (आंतरराष्ट्रीय योग दिवस )संपूर्ण देशात साजरा केला जातो सकाळी 5 ते 6:30 या वेळात हे योग शिबिर घेण्यात आली पतंजली योग समिती विलासराव देवसरकर व प्रकाश दुधेवार यांनी प्राणायाम व योगासने घेतली व प्राणायाम व योगाचे उपयुक्तता समजून सांगितले तर महिलांमधून प्रतीभा जासुद यांनी महिलांना योगाचे प्रात्यक्षिके करून दाखविली.

यावेळी प्रा युसुफ सर, श्रीराम चव्हाण व मनीषा काळेश्वरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना योगाचे तथा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगितले यावेळी उमरखेड येथील योग व प्रेमी साधकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तसेच महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

या योग शिबिरात बृहस्तिका कपालभाती अनुलोम विनुलोम प्राणायाम वेळी संजय मुटकुळे व शीतल मुटकुळे यांनी संगीत गीता मधून प्रेरणादायी वातावरण निर्मिती केली यावेळी औदुंबर ज्येष्ठ नागरिक मंडळ औदुंबर वृक्ष समिती इनरव्हील क्लब नैसर्गिक पर्यावरण व संवर्धन समिती अ भा ग्राहक पंचायत असे अनेक कार्यकर्त् योग् शिबीरात सामील झाले होते शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांचे उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

यावेळी रथिराव बोरगडे, डॉ महेश बट्टेवार, भारत कुलकर्णी, विजय सोनवणे, झाडे मॅडम, तास्के मॅडम यांनी निरीक्षण करून योग साधकाकडून योगा असणे करून घेतले. यावेळी ओम सारडा, दिगंबर तवर, दीपक ठाकरे, दिलीप भंडारे, संजय भंडारे, धनंजय पत्तेवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात साधक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पतंजली समितीचे तालुका प्रभारी यशवंत गिरी यांनी केले तसेच सौ माधुरी देशमुख यांच्या पसायदारांना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here