✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 22 जून)
तालुक्यातील हरदडा येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाबरोबर शारीरिक व आंतरिक विकास होणे महत्त्वाचे असते.
हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी विविध योगासने केलीत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व योग शिक्षण देण्यासाठी तालुक्यातील प्रसिद्ध योगा शिक्षक प्रा. दीपक वाघमारे उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पद्मासन, अनुलोम-विलोम, वज्रासन, वृक्षासन आदि योग प्रकार करत योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक दीपक वाघमारे हे उपस्थित होते तर विद्यालयाच्या प्राचार्या देबोश्री साहा अध्यक्षस्थानी होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.नरेश गंदेवार, सचिव विजय भैय्या जयस्वाल, संतोष तिरमकदार, गणपत गजेलवाड आदींनी शाळेतर्फे सर्व विद्यार्थी , शिक्षक व पालकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन मीरा पोपट यांनी केले तर आभार मिलिंद काकडे यांनी व्यक्त केले.