Home Breaking News महात्मा फुले हायस्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !…. योगासने...

महात्मा फुले हायस्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !…. योगासने व प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार ( मुख्याध्यापक ) नियमित व्यायाम कराल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. – एच.डी.माळी ( योगशिक्षक )

101

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल व नूतन प्राथमिक विद्यामंदिर धरणगाव येथे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले. नियमित योगासने व प्राणायाम केल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते हा मूलमंत्र पवार यांनी दिला.
सर्वप्रथम योग दिनाची सामुहिक प्रार्थना घेण्यात आली. यानंतर शाळेतील योगशिक्षक एच डी माळी यांनी विद्यार्थ्यांना योगासने व प्राणायामाचे विविध प्रकार प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रात्यक्षिक करत असतांना शाळेतील क्रीडा शिक्षक एस एन कोळी यांनी विविध प्राणायाम व योगासने यांचे फायदे व तोटे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत योगासने व प्राणायाम करण्याचा आनंद घेतला व त्याचे फायदे समजून घेतले. समारोपप्रसंगी सामूहिक शांतिमंत्राचे पठण केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार व नूतन प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी तसेच शाळेतील शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी देखील योगासने व प्राणायाम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here