अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515 गंगाखेड :- गंगाखेड नगर पालिकेच्या वतीने गेल्या काही महिन्या पासून दूषित पाणीपुरवठा केला जात असून पाण्यामध्ये तुरटी टाकत नसल्याचे आज अस्वच्छ पाण्यामध्ये दिसून येते. नळाला येणारे पाणी अत्यंत गढूळ , दूषित पाणी पुरवठा करत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसते, कारण गंगाखेड शहरातील हॉस्पिटल मध्ये नागरिकांची घाण पाण्यामुळे संडास,उलटी,जुलाब व पोटाचे आजार इत्यादी पेशंट दवाखान्यामध्ये पहावयास मिळत आहे. त्यामुळेच नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाने पाणी प्रश्नाची दखल घेऊन लवकरच लवकरच दूषित पाणीपुरवठा बंद करून स्वच्छ पाणी देण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रा. जयपाल पंडित,ऍड.विजय साळवे, सिद्धोधन सावंत, मुंजाजी टोम्पे, पठाण रोफ, मोहम्मद शेख, अन्सार सय्यद, अमित जंगले, अभी दुर्गे,करण कसबे इत्यादींनी केली आहे. दूषित पाणीपुरवठा बंद किंवा पाणी पुरवठा स्वच्छ नाही झाल्यास कंटाळलेल्या अनेक नागरिकांनी लोकशाही मार्गाने उपोषणही करण्यात येईल असे निवेदनावर म्हटले आहे.