Home Breaking News मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना...

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे-प्रकाश भैय्या सोनसळे

137

 

(बीड प्रतिनिधी)-शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री करा अशी मागणी धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. धनगर समाज हा संख्येच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला आहे या समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या समाजाचा महाराष्ट्रामध्ये एकही कॅबिनेट मंत्री नाही धनगर समाजाचा एकही राज्यमंत्री नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सरकार पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी धनगर समाजाचा महाराष्ट्रामध्ये मोठा वाटा आहे या वाट्यानुसार धनगराच्या वाट्याला एकही मंत्रीपद नाही हे दुर्दैव आहे. धनगर समाज हा भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. धनगर समाजाला या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आमदार राम शिंदे , आ.गोपीचंद पडळकर ,आ. दत्तामामा भरणे, आ. महादेव जानकर यांना भाजप सरकारने मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावे.
शिंदे- फडणवीस सरकारने मंत्रिमंडळामध्ये धनगर समाजाला स्थान दिले नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा समाज नक्कीच या राज्य सरकारच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही याची दखल या राज्य सरकारने घ्यावी.
आ.पडळकर ,राम शिंदे,आ दत्ता मामा भरणे,आ.जानकर यांना शिंदे -फडवणीस सरकारने मंत्री करावे अशी मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे करणार आहे असे धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भैया सोनसळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here