Home यवतमाळ मांडवा येथे तथागत गौतम बुध्द मुर्ती प्रतिष्ठापना

मांडवा येथे तथागत गौतम बुध्द मुर्ती प्रतिष्ठापना

141

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद -तालुक्यातील मांडवा येथील सम्यक संबोधी बुध्दविहारात जगाला शांतीचा संदेश देणारे, महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या( वैशाख पौर्णिमा) जयंतीचे औचित्य साधून बुध्द रुप प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करुन गावातील मुख्य मार्गाने पुजनीय भिक्खू संघ,भिक्खुणी संघ,श्रामणेर संघ व समता सैनिक दल यांच्या उपस्थितीत शांती रॅली काढण्यात आली होती. सकाळी १० वाजता भंदत धम्मसेवकजी महाथेरो मुळावा, डॉ. खेम्मोधम्मो मुळावा , डॉ. सत्यपाल महाथेरो मुळावा, भदंत दयानंदजी महाथेरो मुळावा, भदंत बि. बुध्दपालजी महाथेरो अकोला,भदंत अश्वजित थेरो मुळावा, धम्मदिना आर्याजी बोरी, बुध्दसेविका आर्याजी मुळावा, सत्यरक्षिता आर्याजी मुळावा, तसेच भिक्खूसंघ ,भिक्खूणी संघ, श्रामणेर संघ यांच्या हस्ते बुध्द रुपाची प्रतिष्ठापना करण्यात आली. व धम्मदेसना देण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनिल नाईक,तर प्रमुख पाहुणे म्हणून संबोधी सोनकांबळे केंद्रीय शिक्षक नांदेड, भारत कांबळे तालुकाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा, माजी जि.प.सदस्य भोलानाथ कांबळे,अभिजित पवार, महादेव डोळस, डॉ. सदिप चव्हाण,अल्का ढोले सरपंच मांडवा, विजय राठोड उपसरपंच,दत्तराव पुलाते पो.पाटील, सर्व ग्रा.पं.सदस्य, गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थ,हे उपस्थित होते.

स्वागतोत्सुक म्हणून राजरत्न ढोले व रमेश ढोले मुळावा उपस्थित होते.

यावेळी भोजनदान देण्यात आले.आणि त्यानंतर
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक ऋषभ हाटकर व गायिका पुजा बागल आणि संच यांचा सायंकाळी ७:३०वाजता बुद्ध भीम गीताचा बहारदार कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाच्या या यशस्वीतेसाठी सम्यक संबोधी बुध्दविहार समिती व सुजाता महिला मंडळ आणि समस्त गावकरी मंडळी यांनी अथक परिक्षम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here