Home महाराष्ट्र पुसद येथे बुध्द जयंती निमित्त शांती रॅलीने वेधले पुसदकरांचे लक्ष

पुसद येथे बुध्द जयंती निमित्त शांती रॅलीने वेधले पुसदकरांचे लक्ष

180

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद -जगाला शांतीचा संदेश देणारे, महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती (वैशाख पौर्णिमा)निमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध रुपाच्या देखाव्यासह,श्रामणेर संघ,समता सैनिक दलासह शांती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

शांती रॅली पारमिता बुद्धविहार महाविरनगर पासून वसंतराव नाईक चौक ,महात्मा फुले चौक,तीन पुतळा चौक समिती छत्रपती शिवाजी वार्ड यांच्या वतीने खिरदान करण्यात आले ,छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भंदत बि.बुध्दपालजी महाथेरो अकोला यांनी त्रिशरण पंचशील घेतले.
एल.पी.कांबळे यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
संबोधी सोनकांबळे केंद्रीय शिक्षक नांदेड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी भारत कांबळे भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्ष, अर्जुन भगत अध्यक्ष प्रज्ञापर्व २०२४, विजय निखाते उपाध्यक्ष, मिलिंद जाधव कोषाध्यक्ष, राहुल पाईकराव सहकोषाध्यक्ष, प्रमोद धुळे संघटक, सुखदेव भगत, पि.सी.शेळके, उध्दव भगत,विठ्ठल कांबळे, प्रभाकर पाईकराव, नरेंद्र पाटील, संतोष सोनोने, किसन धुळे , भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी ,समता सैनिक दलाचे महिला व पुरुष सैनिक, प्रज्ञापर्व समितीचे पदाधिकारी,उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद खडसे यांनी केले. तर आभार भोलानाथ कांबळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here