Home महाराष्ट्र नाशिक येथे २२ मे २०२४ ला शेतकरी मेळावा व सत्कार सोहळा

नाशिक येथे २२ मे २०२४ ला शेतकरी मेळावा व सत्कार सोहळा

181

 

प्रकल्प संचालक आत्मा, नाशिक व सलाम किसान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे येत्या २२ मे, २०२४ रोजी नाशिक येथे शेतकरी मेळावा व सत्कार सोहळा हा उपक्रम आयोजित केलेला आहे. या उपक्रमास नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधव व FPO (फार्मर प्रोड्युसर कंपनी -शेतकरी उत्पादक कंपनी) यांना पाचारण करण्यात आलेले आहे. तरी ज्या शेतकरी बांधवानी यशस्वीपणे प्रयोग करून उत्तमोत्तम शेतीमध्ये कामगिरी बजावली आहे त्यांचा येथे प्रमुख अतिथी वर्गाकडून सत्कार समारंभ होणार आहे. सोबतच या कार्यक्रम ला शासकीय विभागाकडून अधिकारी वर्गाची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.

यासोबतच या कार्यक्रम ला येणाऱ्या शेतकरी बांधवाना अत्याधुनिक तांत्रिक उपकरण कृषी ड्रोन च्या माध्यमातून कोणत्या प्रकारे फायद्याची शेती केल्या जाऊ शकते व त्याला कशाप्रकारे नफ्याच्या बिझनेस मध्ये रूपांतरण करता येईल याचे मार्गदर्शन सलाम किसान संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षयजी खोब्रागडे व कृषी शास्त्रज्ञ विक्रम थेटे
करणार आहेत. यासोबतच शेतकरी बांधवाना अल्प दरात मातीचे परीक्षण करून मिळेल. कार्यक्रमाचे स्थळ रामसीता लॉन्स, नांदुर, छत्रपती संभाजी नगर रोड, पंचवटी, नाशिक येथे सायंकाळी ४ वाजता पासून सुरु होईल.

तरी याप्रकारच्या नाविन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमास अधिकाधीक शेतकरी बांधवानी उपस्थिती लावावी व कार्यक्रमाला येतांना योग्य मातीचा नमुना घेऊन यावा अशी विनंती सलाम किसान संस्थेकडून योगेश थोरात, विकास अधिकारी नाशिक, विशाल पवार व रोहित शिंदे, ड्रोन पायलट यांच्याकडून करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here