Home महाराष्ट्र धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस दंड व कारावास गंगाखेड शुगरच्या बाजूने दिला...

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस दंड व कारावास गंगाखेड शुगरच्या बाजूने दिला निकाल : अनेकांचे धाबे दणाणले

346

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड :-परळी तालुक्यातील मौजे.इजेगाव येथील रहिवासी एकनाथ नारायण कराड यांना धनादेश अनादर प्रकरणी दोषी ठरवून गंगाखेड न्यायालयाने धनादेशाची मूळ रक्कम १ लाख ५७ हजार १८९ रूपये तसेच नुकसान भरपाई म्हणून २० हजार रूपये एक महिन्याच्या आत देण्यासह तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावत चांगला दणका दिला आहे. तसेच रक्कम देण्यास कसूर झाल्यास आणखी एक महिना कारावास देण्याचे न्यायालयीन आदेशात म्हटले आहे.

तालुक्यातील मौजे.माखणी येथील गंगाखेड शुगर ॲन्‍ड एनर्जी लि. यांच्याकडे सन २०११-१२ या गळीत हंगामात आरोपीने ऊसतोड व वाहतुक ठेकेदार म्हणून करार केला होता. त्या करारापोटी आरोपीला ९ लाख रूपये ॲडव्हान्स दिले होते. त्यानुसार त्याने काम करणे अपेक्षित होते. परंतु आरोपीने कामात कसूर केली.‌ परिणामी, अंतिम हिशेब केल्यास आरोपीने २ लाख ४३ हजार १७० रूपये देणे आवश्यक होते. त्यामुळे आरोपीने कारखान्यास त्या रक्कमेचा धनादेश दिला. मात्र, आरोपीच्या खात्यात धनादेश इतकी रक्कम नसल्याने कारखान्याची फसवणूक झाली. त्यामुळे कारखान्याच्या वतीने फिर्यादी म्हणून नंदकिशोर शर्मा यांनी गंगाखेड न्यायालयात धाव घेतली होती.

या खटल्यात रामलिंग कोंडलवाडे आणि सुमित किशोर मानकर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गंगाखेड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायमूर्ती निशांत रूद्रभटे यांनी आरोपीस कलम १३८ निगोशिबल इन्स्ट्रमेंट ॲक्ट तहत दोषी ठरवून शिक्षा सुनावली.‌ या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ ॲड.सुनिल कागणे व ॲड.मिलिंद क्षिरसागर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.जितेंद्र सोनसळे यांनी विशेष सहकार्य केले. दरम्यान, करखान्याकडून उचल घेवून फसवणूक करणाऱ्या अनेकांचे या निकालामुळे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here