Home चंद्रपूर ‘उमेद’ अंतर्गत सर्व स्वयंसहायता समूहांना वैयक्तिक बैंक खाते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे...

‘उमेद’ अंतर्गत सर्व स्वयंसहायता समूहांना वैयक्तिक बैंक खाते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे पत्र अतिरिक्त खेळते भांडवल रक्कम ग्राम संघाकडे जमा परंतु पोचपावती देण्यास विसरले

246

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- उमेद’ अंतर्गत एनआरईटीपी (राष्ट्रीय आर्थिक परिवर्तन प्रकल्प) हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत बचतगटांना उद्योगक्षम बनविणे, त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देणे, खेळते भांडवल कर्ज रूपात देणे, उत्पादक संघ तयार करणे, त्यांना खेळते भांडवल देणे यासह अन्य काही बाबींचा समावेश आहे. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी केंद्र सरकार व राज्य सरकार हे उपलब्ध करून देतात.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती, ब्रम्हपुरी येथील महिला बचत गट अर्हेर – नवरगाव यांना अतिरिक्त खेळते भांडवल रक्कम महीला ग्रामसंघ, अर्हेर – नवरगाव बैंक खात्यात वळती करण्याचे पत्र देण्यात आले. स्वयं सहाय्यता समूहाचे बैंक खात्यात अतिरिक्त खेळते भांडवल देय रकमेपेक्षा जास्तीचे जमा झालेली असल्यामुळे आपल्या स्वागत महिला ग्राम संघ, अर्हेर-नवरगावच्या बँक खात्यात वळती करण्यात यावे. सदर सूचनांकडे दुर्लक्ष करून शासकीय निधी परत करण्यास टाळाटाळ केल्यास आपल्या समूहाचे बैंक खाते तात्पुरत्या स्वरुपात वेळ पडल्यास समूहातील सर्व सदस्यांचे वैयक्तिक बैंक खाते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येईल तसेच समूहातील सर्व सदस्यांच्या नावाने मंजूर झालेल्या शासकीय योजना तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात येईल असे आदेश उमेद अंतर्गत पत्रात देण्यात आले. त्यामुळे समूहातील काही सदस्यांच्या मनात बँक खाते बंद होण्याची भीती निर्माण झाली. ग्रामसंघ अर्हेर – नवरगाव यांच्याकडे कॅश भांडवल वळती करण्यात आली परंतु दोन महिने होऊन सुद्धा त्याची पोचपावती समूहाला मिळाली नाही.
_____________________
अतिरिक्त भांडवल समूहाला पाठविणे चुकीचे आहे. हे बघायला पाहिजे होते. भांडवल पाठवायच्या अगोदर चेक करायला पाहिजे होते. ग्राम संघाना अतिरिक्त भांडवल जमा करताना ते चेक देऊन करावे.
— रवींद्र जे. घुबडे गट विकास अधिकारी (प्रभारी)
______________________

सभा घेऊन सर्व समूहातील सदस्यांना कळविण्यात आले. स्वयं सहाय्यता समूहाचे बैंक खात्यात अतिरिक्त खेळते भांडवल देय रकमेपेक्षा जास्तीचे जमा झालेली असल्यामुळे आपल्याला महिला ग्राम संघ, अर्हेर-नवरगावच्या बँक खात्यात वळती करायचे आहेत. — अमोल मोडक (बी. एम. उमेद ब्रम्हपुरी)
______________________________

आलेले पैसे आम्ही परत कसे करावे. कारण विश्वास कुणावर ठेवायचा जवळपास 16 समुहांनी अतिरिक्त भांडवल परत केले असता दोन महिने होऊन सुद्धा पोचपावती मिळाली नाही. आम्ही माहिती काढले असता चेक देऊन अतिरिक्त भांडवल परत करायचे आहेत. अशी माहिती प्राप्त झाली उमेद कडून आम्हाला अशी अपेक्षा मुळीच नव्हती.
— समूहातील सदस्य (अर्हेर – नवरगाव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here