साकोली : श्री. संत शिरोमणी रविदासजी महाराज विभागीय सेवा संस्था मौदा जि. नागपूर (महा.) अंतर्गत शनि. ११ ला आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या निवासस्थानी भंडारा येथे चर्मकार समाजाचा वधू वर परिचय सोहळा निमित्ताने व समाजाच्या विविध कार्य बद्दल सभा संपन्न झाली यात साकोली तालुका अध्यक्षपदी आनंद सोनवाने यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला मार्गदर्शक आमदार नरेंद्र भोंडेकर, संस्थाअध्यक्ष राजू खवसकर, कार्याध्यक्ष ॲड. राहुल बावने व सल्लागार सुरेश अवसरे या सर्व मान्यवर मंडळीच्यानुसार साकोली कार्यकारिणीत आनंद ईश्वरदास सोनवाने रा. साकोली यांची विभागीय संस्थेमार्फत होणाऱ्या समाज हिताच्या वधू वर परिचय सोहळे, विद्यार्थी सत्कार सोहळे, समाज पुरस्कार व अन्य सामाजिक विविध कार्य यशस्वीते करीता साकोली तालुका अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणी सभांमध्ये या बैठकीला उपस्थित भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपुर, गडचिरोली जिल्हास्तरीय चर्मकार समाज जिल्ह्यातील कार्यकारणी करण्यात आली. बहुसंख्येने बंधू भगिनी उपस्थित होते. साकोली शहरातील सामाजिक कार्यकर्ता आनंद सोनवाने यांची निवड झाल्याबद्दल साकोली सेंदूरवाफा चर्मकार समाजातील सदस्यगणांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.