Home पुणे बिबवेवाडी अप्पर डेपो येथे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्सवात साजरी

बिबवेवाडी अप्पर डेपो येथे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्सवात साजरी

493

 

पुणे प्रतिनिधी

महामानव,विश्र्वगुरू,परिवर्तनवादी,सत्वपुरूष,लिंगायत धर्म संस्थापक,सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक,थोर समाजसुधारक,वर्गविरहित समाज निर्माता जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९३ वी जयंती अक्षय-तृतीया दि. 10 मे रोजी बिबवेवाडी अप्पर डेपो येथे श्री संगनबसवेश्वर तरुण मंडळाच्या वतीने विविध उपक्रमाने मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

बाजीराव रोड येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला संगनबसवेश्वर तरुण मंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी ज्योत प्रज्वलित करून ती ज्योत पायवाट मार्गे अप्पर डेपो येथे इच्छित कार्यक्रम स्थळी आणून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, मा नगरसेवक पिंटू भाऊ धाडवे,नगरसेवक बाळासाहेब ओसवाल,नगरसेविका रुपालीताई दिनेश धाडवे,नगरसेविका वर्षाताई साठे, भाजपा अनु :जाती मोर्चा शहर अध्यक्ष भीमराव साठे, शिव संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शैलेश जकापुरे, युवा उद्योजक संजय पाटील,सामाजिक कार्यकर्ते मनोज देशपांडे,अखिल भारतीय मराठा पुणे शहर उपाध्यक्ष -भाजपा पर्वती सरचिटणीस ज्ञानेश्वर माऊली मानकर,श्री गणेश मित्र मंडळ अध्यक्ष प्रीतम शेठ नागपुरे,शिवशंभो टायर्स मा यार्ड गणेश घाटे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर सरचिटणीस गणेश मोहिते,गनिमी कावा युवा सेवा संघ संजय वाघमारे,युवा उद्योजक मधुकर सुरवसे, या सर्व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली.यावेळी प्रमुख उपस्थितांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग व त्यांची शिकवण याविषयी सर्व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.

याचवेळी महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा देखील मोठ्या संख्येने महिलांच्या उपस्थित पारंपारिक पद्धतीने महिलांनी पाळण्याची पूजा करून जन्माचा पाळणा सोहळा,गीत गाऊन व महात्मा बसवेश्र्वरांचा गजर केला.या कार्यक्रमात मोठ्या संख्येने अप्पर डेपो येथील बसवेश्वर भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये संगनबसवेश्वर तरुण मंडळाचे
संस्थापक अध्यक्ष अशोक धोनी वर्दाळे, अध्यक्ष खंडू माने,उपाध्यक्ष शिवशरण रामचंद्र चिकमळ, सचिव शांतमल काळे,संग्राम आळदे,सुनील चिकमळ,बसवराज माळी,अभय माळी,बसवराज आलदे,श्रीशैल चिकमळ,संतोष माळी,रामेश्वर बिराजदार, सायबण्णा म्हेत्रे, शरणप्पा आलदे,बसवराज चौघुले, श्रीशैल निंगदळी,पुंडलिक बिराजदार,खजिनदार रेवणप्पा चिकमळ,सिद्धाराम माळी,रवी आलदे,जगदीश येणंपुरे,प्रकाश थंब,संतोष माळी,स्वागतोत्सुक इराण्णा मंठाळे,कार्याध्यक्ष मल्लिनाथ फुलारी,व साप्ताहिक राष्ट्रहित सर्वोपरी मीडिया समूहाचे मुख्य संपादक अमोल धडके, सर्व संघटक,कार्याध्यक्ष,आधारस्तंभ कार्यकर्ते, छोटे कार्यकर्ते,महिला व मंडळ,स्वागतोत्सुक,संगनबसवेश्वर तरुण मंडळाचे सर्व सभासद,स्थानिक नागरिक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडू माने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here