Home बीड दुष्काळी मराठवाड्यातील फळबागासाठी शासनाने प्रतिहेक्टरी एक लाखाची मदत करावी :- बाजीराव ढाकणे...

दुष्काळी मराठवाड्यातील फळबागासाठी शासनाने प्रतिहेक्टरी एक लाखाची मदत करावी :- बाजीराव ढाकणे मराठवाडा पाणी परिषदेची आग्रहाची मागणी

82

 

बीड प्रतिनिधी:- मराठवाड्यात यावर्षी अल्प प्रजन्यमानामुळे भूजल पातळी खालावलेली असून पाण्याअभावी फळबागा तोडाव्या लागत आहेत. 9 ते 14 एप्रिल 2024 दरम्यान मराठवाड्यातील काही भागात झालेल्या अवकाळी गारपीट पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळबागाचे नुकसान झाले आहे. सरसकट सर्व फळबागधारक शेतकऱ्यांचे पंचनामे करून *प्रति हेक्टरी एक लाखाची मदत करावी* अशी निवेदनाद्वारे मागणी मराठवाडा पाणी परिषदेने केली आहे. शासनाने मदत नाही केल्यास मराठवाड्यातील फळबागा नामशेष होतील व ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकरी कोलमडून पडेल. शासनाने त्वरित फळबाग धारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी *प्रती हेक्टरी एक लाखाची मदत करावी याबाबतचे कृषी सहसंचालकांना निवेदन देण्यात आले, यावेळी मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, बीड जिल्हा प्रमुख बाजीराव ढाकणे* उपाध्यक्ष मनोहर सरोदे, रविंद्र बोडके, रविंद्र सातदिवे, अनिल चौधरी, भाऊसाहेब मते, संदीप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठवाड्यातील फळबागा जगविण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत तरच फळबागा जगतील अशी मागणी मराठवाडा पाणी परिषदचे बाजीराव ढाकणे यांनी केली आहे.
मराठवाड्यातील अनेक फळबागा पाण्या अभावी जळुन चालल्या आहेत. सरकारने या फळबागांना टॅंकर द्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मराठवाडा पाणी परिषदचे बाजीराव ढाकणे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here