Home महाराष्ट्र वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये विद्यापीठस्तरीय कार्यशाळा

130

कराड : (दि. ८, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मध्ये IQAC व प्रवेश समिती आयोजित शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत “NEP: 2.0 श्रेयांक आराखडा, प्रवेश प्रक्रिया व माहितीपत्रक” या विषयावर शुक्रवार दि. 10 मे 2024 रोजी विद्यापीठस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यशाळेचे उदघाटन सकाळी 10 वाजता मा. श्री अल्ताफहुसेन मुल्ला (जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे उच्च शिक्षण मंडळ) यांच्या शुभहस्ते होणार असून सदर कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून मा. श्री अरुण पांडुरंग पाटील (काका) (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे उच्च शिक्षण मंडळ) उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेस प्रनुख साधनव्यक्ती म्हणून मा. डॉ. प्रकाश कुंभार (अधिसभा सदस्य व सदस्य इंग्रजी अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) आणि मा. प्रा. डॉ. केदार मारूलकर (वाणिज्य विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. .
या कार्यशाळेत श्रेयांक आराखडा, विषय निवड, प्रवेश प्रक्रिया व माहितीपत्रक याबाबत सखोल मार्गदर्शन व चर्चा होणार आहे. तरी विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्रवेश समिती निमंत्रक, सदस्य व माहितीपत्रक प्रमुख यांनी शुक्रवार दि. 1 मे 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे बहुसंख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मा.प्रा. (डॉ.) श्रीमती एस. आर. सरोदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here