Home चंद्रपूर मराठा सेवा संघ वरोरा तालुका अध्यक्षपदी विनोद आत्राम यांची निवड

मराठा सेवा संघ वरोरा तालुका अध्यक्षपदी विनोद आत्राम यांची निवड

265

वरोरा – छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय महाविद्यालय जुने डी. एड कॉलेज वरोरा येथे मराठा सेवा संघ कार्यकारणी निवडीसाठी मा. शिवश्री दिपकभाऊ जेऊरकर प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ महाराष्ट्र याचे अध्यक्षतेखाली, जिल्हा सचिव शिवश्री सुरेश माळवे, जिल्हा कार्यालयीन सचिव शिवश्री महादेवराव ढुमने,संघटक तथा छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय महाविद्यालय वरोराचे संचालक शिवश्री सुधाकरराव खरवडे यांचे प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली, सभेत सर्वसंमतीने आदर्श व्यक्तिमत्व पेशाने शिक्षक असलेले शिवश्री विनोद आत्राम यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष शिवश्री राकेश म्हैसमारे, सचिव दत्तात्रय गावंडे, कोषाध्यक्ष नरहरी बनसोड यांची निवड करण्यात आली पुढील कार्यकारणी विस्तार करण्याचा अधिकार नवनिर्वचित कार्यकरणीला देण्यात आला. जिल्हा समन्वयक चंद्रशेखर झाडे यांनी सभेचे नियोजन तथा सूत्रसंचालन केले. याप्रसंगी रामचंद्र सालेकर, गणपत येटे, प्रभाकर देशेवार,डॉ. विराज टोंगे,विठ्ठलराव भेदूरकर, संदीप सोनेकर,चंदुभाऊ गौरकर, अशोक टिपले, दिलीप टिपले आदींनी नवीन कार्यकारणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मराठा सेवा संघाची पुढील वाटचाल कशी असावी याबाबत ढुमने सरांनी मार्गदर्शन केले, सभेची सांगता अशोक टिपले यांनी समारोपीय आभारप्रदर्शन करून केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here