Home चंद्रपूर चंद्रपूर शासकीय रुग्णालयात मनमानी कारभार सुरु

चंद्रपूर शासकीय रुग्णालयात मनमानी कारभार सुरु

116

 

चंद्रपूर:- शासकीय रुग्णालयात मनमानी कारभार सुरु आहे. दि.22.4.2024 रोजी रात्री 11 वाजता महिला पेशन्टला चाचणी करीता नेले असता वापस पाठविण्यात आले असताचा प्रकार झाला आहे.

सविस्तर असे कि रात्री 11 चा सुमारास महिला पेशन्टची तब्बेत ठीक नसल्यामुळे चंद्रपूर शासकीय रुग्णालयात नेले असता चिट्टी काढा तेव्हाच चेकप करणार असे सांगण्यात आले.

चिट्ठी काढण्यासाठी गेले असता 20 रुपये लागतील सांगण्यात आले. पण 500 रुपये दिले असता चिल्लर नाही असे सांगण्यात आले. चिट्टी काढनाऱ्या व्यक्तीने चिल्लर नाही तर चेकप होणार नाही असे म्हटले.आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

पेशन्टचा नातेवाईकानी त्यांना विनवणी केली पण काही उपयोग झाला नाही. तुम्ही चंद्रपूर फिरा नाही तर काही पण करा पण 20 रुपये आणल्या शिवाय चिट्टी देणार नाही असे म्हटले.

चिट्टी काढनाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव विचारले असता तो नाव सांगण्यास तयार नव्हता, उलट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

पेशन्टचा नातेवाईकांनी पेशन्टला काही झाल्यावर जबाबदारी कुणाची असणार असे विचारले असता चिट्टी काढनाऱ्या व्यक्तीने उलट-सुलट बोलण्यास सुरुवात केली.

पेशन्टचा नातेवाकांनी चिट्टी काढणाऱ्या व्यक्तीवर कारवाही करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here