बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद – स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि लोकशाही मूल्य टिकवण्यासाठी अखंडित देशाचे संविधान संविधानाची जनजागृती करणाऱ्या उसाच्या शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त 14 एप्रिल 2024 रोजी भिम टायगर सेना यवतमाळ शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पुसद येथे प्रत्येक प्रभागातून निघणाऱ्या मिरवणुक जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता आंबेडकरी कार्यकर्त्यांचे निळ्या क्रांतीचे निशाण असलेले निळे फेटे बांधून उत्साह पूर्ण वातावरणात जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ययाती नाईक कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी नेते प्रज्ञापर्व माजी अध्यक्ष भीमराव दादा कांबळे, माजी नगरसेवक महेश खडसे,शितल कुमार वानखेडे, बुद्धरत्न भालेराव, बिरसा ब्रिगेडचे मारोती भस्मे, पांडुरंग व्यवहारे, साकिब शहा,युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राजेश ढोले, वाईस ऑफ मीडियाचे समाधान केवटे, परमेश्वर जयस्वाल,गीता ताई कांबळे
इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू सरकटे यांनी केले. शेवटी जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.