कोल्हापूर (प्रतिनिधी) : निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षण विषयक भूमिका विशद करणारे, भारतातील सामाजिकदृष्ट्या मागास आणि वंचित समूहातील मानवाने शिक्षण कशासाठी घ्यावे? याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वतःची मते काय होती? इतर शिक्षणतज्ञापेक्षा ते शिक्षणाकडे वेगळ्या दृष्टीने कसे पाहत होते? शिक्षणामुळे पदवी मिळते, आर्थिक स्वावलंबी होता येते हा हेतू त्यांनी दुय्यम स्थानी का ठेवला होता? शिक्षण हे प्रज्ञा आणि नैतिक संपदांसाठी आवश्यक आहे ही आंबेडकरी शिक्षणाची सम्यक चौकट शब्दबद्ध करणाऱ्या प्रा. डॉ. गिरीश मोरे लिखित आंबेडकरी शिक्षणाचा परिप्रेक्ष या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवार दि. 13 एप्रिल, 2024 रोजी सायं. 5:30 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी कवी व पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत प्राचार्य डॉ. हरीश भालेराव कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते बसवंताप्पा उबाळे यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
सदर ग्रंथ प्रकाशन समारंभास फुले, शाहू, आंबेडकरवादी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निर्मिती प्रकाशनचे अनिल म्हमाने व प्रा. डॉ. शोभा चाळके यांनी केले आहे.