धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे भारतातील थोर समाज सुधारक, विचारवंत, शिक्षणतज्ञ, स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसुर्य, महामानव, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांचा जयंती महोत्सव निमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एम बी मोरे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एच डी माळी, एस व्ही आढावे, एस एन कोळी, व्ही टी माळी, पी डी पाटील, अशोक पाटील, जीवन भोई तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.