Home यवतमाळ प्रा.डॉ. भास्कर पाढेन यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न

प्रा.डॉ. भास्कर पाढेन यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न

193

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद- फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद, वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे, फुलसिंग नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य तथा वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. भास्कर पाढेन यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने निरोप समारंभ आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमांमध्ये सत्कारमूर्ती प्राचार्य प्रा. डॉ.भास्कर पाढेन, सोबतच त्यांच्या पत्नी पाढेन मॅडम, सिद्धांत पाढेन, प्रा.भूषण मनगटे आणि प्रा. प्रसन्न देशमुख मंचावर उपस्थित होते.

समारंभाची सुरुवात महाविद्यालयाचे प्रेरणास्थान स्व. कै. फुलसिंग बापू नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये सर्व प्राध्यापकांकडून सत्कारमूर्ती डॉ. भास्कर पाढेन सर आणि त्यांच्या पत्नी यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. भूषण मनगटे यांनी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सरांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. सर्व प्राध्यापक वर्गाने सरांसोबत चे आपले अनुभव व सरांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. प्रा. डॉ .भास्कर पाढेन यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष जय भाऊ नाईक व सचिव मनोहरभाऊ नाईक यांच्या आभार मानले व त्यांनी संस्थेतील आपल्या सुरुवातीच्या काळापासून तर आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा सांगितला. आणि विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात कशा पद्धतीने यश संपादन करावे याबद्दल मार्गदर्शन केले.
या समारंभामध्ये डॉ. कोमल गुप्ता, प्रा. पवन शर्मा, प्रा. आवेश निरबान, प्रा. अर्पिता गोरे तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन गोपाल पवार व आकांक्षा गडदे यांनी केले आणि आभार प्रदर्शन रोशनी राठोड यांनी केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here