बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114
चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे यांना गोपनीय बातमी मिळाली की, चकलांबा फाट्या जवळील महाराज टाकळी येथे एका लिंबाच्या झाडाखाली काही इसम तिरट नावाचा पत्याचा जुगार खेळत आहेत. तसेच राक्षसभवन येथे एक इसम स्वरट नावाचा जुगार खेळवत असून त्यानुसार लागलीच टीम पाठवून खात्री करून रेड केली असता खालील इसम रमेश भाऊसाहेब केस भट (वय ५७ रा. गायकवाड जळगाव ता. शेवगाव),
सलीम बादशाह पठाण (वय ६० रा. महार टाकळी ता. गेवराई),
अशोक दशरथ महानोर (वय ५१ रा. महार टाकळी), राम विलास सौंदलकर (वय ४० रा.महाटाकळी), शब्बीर जाफर शेख (वय ४९ रा. महार टाकळी), राजेंद्र नामदेव कवळे (वय 45 रा. महार टाकळी), भाऊसाहेब किसन महानोर (वय ४५ रा. महार टाकळी), कांता हरिभाऊ कवळे (वय ५५ वर्ष रा.महार टाकळी), पंडित बाजीराव खोसे (वय ५० रा.गायकवाड जळगाव), सुभाष सुदाम पोटफोडे (रा.राक्षस भवन) हे दहा जुगारी विनापरवाना व बेकायदेशिर तिर्रट व सोरट नावाच्या पत्त्याचे जुगारावर पैसे लावून जुगार खेळतांना मिळुन आले असुन, त्यांच्या ताब्यातुन रोख पैसे, पत्ता व चार मोटार सायकल असे एकुण 1,88,130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधीकारी नीरज राजपुरु, यांचे मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि नारायण एकशिंगे व सोबत पोउपनि अनंता तांगडे, प्रो.पोउपनि कुमावत, पो.ह/ 1533 अमोल येळे, पोअं/2291 तुकाराम पवळ, पोअं/2004 विठ्ठल खटाने, चालक गर्जे यांनी केली आहे. पुढील तपास हवालदार मारुती केदार करत आहेत