Home Breaking News स्व जिल्हातील वादग्रस्त शिक्षणाधिकारी गरूड यांना कार्यमुक्त कराःमुख्य निवडणूक आयुक्ताकडे मागणी

स्व जिल्हातील वादग्रस्त शिक्षणाधिकारी गरूड यांना कार्यमुक्त कराःमुख्य निवडणूक आयुक्ताकडे मागणी

106

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

*
गंगाखेडः मुख्य निडणूक आयोग यांच्या आदेशान्वये लोकसभा निवडणूक अनूषंगाने स्व जिल्हातील अधिकाऱ्यांचा पदस्थापना इतञ जिल्हात करण्याचे आदेश आसताना वादग्रस्त स्व जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरूड यांची प्रशासकीय बदली झालेली आसताना अद्यापही त्यांना कार्यमुक्त न केल्याने राज्य निवडणूक आयुक्त यांच्या कडे तक्रार करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयुक्त मुंबई विभागीय आयुक्त जिल्हा अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात वादग्रस्त मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती. आशा गरुड यांची सहाय्यक आयुक्त परिक्षा परिषद पूणे येथे शासन आदेश दि. 11.03.2024 रोजी पदस्थापना दिली आसताना सुध्दा त्याना सीओ यांनी शिक्षणाधिकारी पदावरुन कार्यमुक्त केलेच नाही.लोकसभा निवडणूक आचार संहिता लागु होण्या आगोदरच मुख्य निवडणूक आयोग यांनी स्वजिल्हयातील अधिकाऱ्यांना इतरत्र जिल्हात पद स्थापना करण्याचे निर्देश दिले होते श्रीमती.गरुड परभणी जिल्हातीलच आसून त्यांनी जिल्हात केलेल्या नियमबाह्य बोगस शिक्षक भरती प्रकरणात निलंबीत केले होते मॕट मधुन परत जिल्हातच शिक्षणाधिकारी पदावर आल्या आसता शासनाने त्यांची उचलबांगडी केलेली आसताना सीओ यांनी त्यांना अद्यापही कार्यमुक्त केलेच नाही. जालना येथून परभणी शिक्षण विभागात त्यांना एका लोकप्रतिनीधी यांनी आणले होते हे तर उघडच आहे शिक्षणाधिकारी गरूड यांचे राजकीय हितसंबध शिवाय परभणी जिल्हातील शिक्षण संस्था चालकांची आसलेले जवळचे संबध पाहता लोकसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रीयेत दबाव यंञाचा वापर करीत लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात मदत केल्या जाण्याची शक्यता नाकरता येत नाही परभणी जिल्हातील महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधी यांचाशी गरूड यांची आसलेली जवळीक पाहता निवडणूकीवर याचा परीणाम होणार आहे जिल्हातील महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या स्थानिक नेत्याचा सर्व शिक्षण संस्थेत शिक्षक शिक्षकेत्तर बोगस भरती करण्यात गरूड यांचा सिंहाचा वाटा आहे शिक्षक मतदार संघ छञपती संभाजीनगर विभाग निवडणूक दरम्यान परभणी प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी निवडणूकीत हस्तक्षेप होण्याची दाट शक्यता आसल्याने निवडणूक विभागाने त्यांची निवडणूक प्रक्रीया पूर्ण होई पर्यत त्याची पदस्थापना पुणे येथे करण्यात आली होती.भ्रष्ट शिक्षणाधिकारी गरूड यांची तर शासनाने कायमच बदली पुणे येथे केलेली आसताना त्यांना सीओ कार्यमुक्त करत नाहीत हे राज्य निवडणूक आदेशाची पायमल्ली करणारी कृतीच आहे याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त यांनी बदली झालेल्या भ्रष्ट शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरूड यांची तात्काळ पदस्थापना झालेल्या ठिकाणी उचलबांगडी करण्यात यावी कार्यमुक्त न करणाऱ्या सीओ विनय मुन यांची सखोल चौकशी अंती कार्यवाही करावी अशी मागणी एम.बी.भिसे यांनी राज्य मुख्य निवडणूक आयोग मुंबई यांच्या कडे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here