नागभीड प्रतिनिधी:-(संजय बागडे 9689865954)
दि.१३/३/२०२४ बुधवार,
मा.होमदेवभाऊ मेश्राम सदस्य जिल्हा कृषी समिती चंद्रपुर (PMFE) यांनी तालुका कृषी अधिकारी नागभीड यांचेशी,अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे काही कारणास्तव पैसे येणे बंद झाले तरी आपणाकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करुन त्यांचा थांबलेला मिळणारा लाभ मिळवुन द्यावा,तळोधी बा.येथील कृषी केंद्रामधुन चालु खरीप पिकांचे आधी बि बियाणे व औषधे उपलब्ध करुन द्यावी,सध्या उन्हाळी रब्बी,धानपिकावर खोडकिडा व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असुन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रोगांवर कोणते औषध पिकांना द्यावे लागते व आपणाकडे औषधी असल्यास शेतकऱ्यांना पुरविण्याच्या सुचना करण्यात आल्या व शासनाच्या अनेक नवनविन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या तसेच अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी कन्हाळगाव,वलनी,चारगाव,गोविंदपुर,तळोधी,कोदेपार,आकापुर,देवपायली,खरबी व तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.