Home विदर्भ रात्री अनुचित घटनेवर आळा घाला ; माजी सरपंच प्रताप चुघ व फ्रिडमचे...

रात्री अनुचित घटनेवर आळा घाला ; माजी सरपंच प्रताप चुघ व फ्रिडमचे किशोर बावणे यांची मागणी.

116

 

साकोली : येथील लाखांदूर रोड गोवर्धन चौकातील हाईमास्ट लाईट कित्येक महिन्यापासून बंद आहे. तिथल्या नागरिकांनी विनंती केली आहे की लाखांदूर रोड टी पाईन्ट वरील लाईट खूप दिवसापासून बंद पडलेली आहे. कितीतरी महामार्ग विभागाला सांगितले पण संताप एवढा येत आहे पण ही साकोली अतिशांतमय आहे. यावर नगरपरिषदेने आता उपाय करावा अशी मागणी येथील ग्रामपंचायत साकोलीचे माजी सरपंच प्रताप चुघ व फ्रिडमचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी केली आहे. या साकोलीच्या पहिल्या आणि मुख्य जूने शहर चौकातून दक्षिणमार्ग लाखांदूर, वडसा, चंद्रपूर, गडचिरोली व पश्चिममार्ग भंडारा, नागपूरला जाणारे प्रवाशी टी पाईन्ट वर उभे राहतात. रात्रीला तिथे अंधार राहते. जेवण झाल्यावर नंतर काही नागरिक फिरायला निघतात. अश्या वेळी लाखांदूर रोड वरी अंधार असल्यास महिलांना तिथून जायला भीती वाटे. यातच तेथील उभ्या प्रवाशांसोबत रात्री लूटमार, महिलांचे अंधारात दागदागिने पळविणे, छेडखानी यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रकाराला थारा मिळणार. येथील महामार्गावर लागलेले हाईमास्ट लाईट कितीतरी महिन्यांपासून डेड अवस्थेत आहेत तरीही कुणीच काही तोंडातून एक “ब्र” सुद्धा काढीत नाहीत. आता हे अंधकारमय प्रकार बघता प्रत्येक जनतेवर पथदिवे टैक्स आकारणा-या नगरपरिषदेने यावर तातडीने उपाययोजना करून हा न्यायालय मुख्य गोवर्धन चौक प्रकाशमय करावा अशी मागणी विकासमय असलेली त्यावेळची ग्रामपंचायत माजी सरपंच प्रताप चुघ व फ्रिडमचे किशोर बावणे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here