Home महाराष्ट्र इंडिया आघाडी जो उमेदवार देईल त्यास निवडून आणणार -मुनीवर शिकलगार

इंडिया आघाडी जो उमेदवार देईल त्यास निवडून आणणार -मुनीवर शिकलगार

142

सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

 

म्हसवड :-
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव करण्यासाठी जो इंडिया आघाडीतील पक्ष सक्षम असेल त्याचाच एकनिष्ठ प्रचार करणार असल्याचे भारत जोडो अभियानाचे समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते मुनिवर शिकलगार यांनी सांगितले.
सध्या सांगली लोकसभा निवडणुकीचा थरार शिगेला पोहोचला आहे.सांगली मतदारसंघात रोज नवनव्या अफवा व चर्चेला उधाण येत आहे.वंचीत आघाडीचे तळ्यात मळ्यात सुरु आहे.या सर्व पार्श्र्वभूमीवर सत्ताधारी भाजप व एनडीएचा मुकाबला करण्याची क्षमता असलेल्या कोणत्याही पक्षाला उमेदवारी मिळेल त्याचा एकनिष्ठ, प्रामाणिक व ताकदीने प्रचार करून त्यास निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणार असल्याचे शिकलगार यांनी सांगितले.
सांगली मतदारसंघात इंडिया आघाडीकडून कॉग्रेसचे युवानेते विशाल पाटील व शिवसेनेकडून (उबाठा) महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे.दोन्ही उमेदवार सक्षम आहेत.ते भाजपच्या उमेदवारांस योग्यप्रकारे लढत देऊ शकतात.त्यामुळे उमेदवार कोणताही असला तरी डावे, समाजवादी, आंबेडकरी व महाविकास आघाडीतील सर्व पक्ष कोणतीही नाराजी, उदासिनता न धरता फक्त भाजपला सारवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही यावेळी भारत जोडो अभियानाचे समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते मुनिवर शिकलगार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here