Home अमरावती महत्मा फुले जयंती दिनी शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर करण्याबाबतचे मा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...

महत्मा फुले जयंती दिनी शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर करण्याबाबतचे मा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन उपेक्षित समाज महासंघ, कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान व पुरोगामी संघटनांतर्फे निवेदन

98

 

अमरावती( प्रतिनिधी )
शासनाच्या वतीने दि.११ एप्रिल ला क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती दिनी सार्वजनिक सुटी जाहीर करावी असे निवेदन उपेक्षित समाज महासंघ संघाचे प्रा. श्रीकृष्ण बनसोड,कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले तसेच श्रीकृष्णदास माहोरे,समाजभूषण सुधाकर विरुळकर,भरतराव खासबागे,वसंतराव भडके, मधुकर आखरे,उत्तमराव भैसने, मनोहर बारसे,डी.एस.यावतकर एड.प्रभाकर वानखडे,ईश्वरदास गायकवाड,रवींद्र पाटील ओमप्रकाश अंबाडकर,अंकुश खंडारे,डॉ. मेश्राम,प्रकाश खंडारे या पुरोगामी विचारधारेच्या फुले – शाहू – आंबेडकरी – संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी अमरावती यांना दि . 7 मार्च 2024 ला निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्याला फुले – शाहू – आंबेडकर यांचे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते . महात्मा फुले यांनी दि. १ जानेवारी १८४८ रोजी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून सामाजिक,शैक्षणिक क्रांती केली. दलित,आदिवासी बहुजन समाजाच्या न्यय्य हक्कांसाठी लढा दिला.विधवा परित्यक्त्या ई .वंचित महिलांनी आत्मनिर्भर व स्वावलंबी व्हावे म्हणून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी संघर्ष केला. त्यांचा लढा सकल मानव जातीसाठी व मानवतेसाठी होता असे सामाजिक – शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांच्या दि.11 एप्रिल ला जयंती दिनी महाराष्ट्र शासन प्रशासनातील सर्वच विभागात, सर्वच शैक्षणिक संस्थेत,सर्व विद्यापीठात,सामाजिक व सांस्कृतिक संघटनेत तसेच प्रत्येक गावागावात महात्मा फुले जयंती उत्सव साजरा व्हावा यासाठी माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here