ढाणकी प्रतिनिधी , राजेश घुगरे मो.9637684021
भारतीय डाक विभाग हा अर्थातच इंडियन पोस्ट पेमेंट बँक स्वरूपात ढाणकी शहरांमध्ये सुरू असलेल्या बँकिंग क्षेत्रात डाक विभाग मार्फत ग्राहकांना इंडियन पोस्ट पेमेंट बँक अकाउंट ओपनिंग करून कार्ड देण्यात आले ग्राहकांना या कार्डद्वारे भारतीय डाक विभागाचे कर्मचारी विड्रॉल देत नसल्याने विड्रॉल देण्यासाठी डाक विभागात एक ऑपरेटर असतो ऑपरेटर ज्या दिवशी सुट्टीवर राहील त्या दिवशी पेमेंट मिळणार नाही असे डाक विभागाचे कर्मचारी सांगत असल्याने ढाणकी शहरातील भारतीय डाक विभागांमध्ये ग्राहकांचे हेळसांड होत असल्याचे दिसत आहे.
आज दिनांक 7 मार्च रोजी काही ग्राहक इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये गेले असता तेथील ऑपरेटर सुट्टीवर असल्याने तो ऑपरेटर 12 मार्च रोजी येईल असे विभागातील कर्मचारी ग्राहकांना सांगत होते व मार्केटमध्ये आधार कार्डवर पेमेंट उपलब्ध राहत आहे त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करता येते असे कर्मचारी सांगत आहे ते पेमेंट काढले त्या सीएसपी केंद्र धारकाला कमिशन देणार कोण अशी विचारणा केली असता तुम्ही तुमचं पाहून घ्या असे भारतीय डाक विभागाचे कर्मचारी सांगत असल्याने सध्या ग्राहक इंडियन पोस्ट पेमेंट बँकेला त्रस्त होत चालले असल्याचे दिसत आहे ग्राहकांची होत असलेली हेळसांड व सातत्याने ऑपरेटर गैरहजर असल्याने ग्राहकांना होत असलेला त्रास त्वरित थांबवा अशी मागणी ग्राहक करत आहे