बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114
केंद्र सरकार मान्यता प्राप्त अँटी-करप्शन फाउंडेशन ही संस्था देशभरात भ्रष्टाचार, लाचखोरी कमी करण्यासाठी कार्यरत आहे. स्वातंत्र्य सैनिकांची इच्छा होती की भारत देश हा भ्रष्टाचार मुक्त व्हावा व सर्वसामान्य जनतेची कामे व्हावी. याच उद्देशाला पूर्ण करण्यासाठी अँटी करप्शन फाउंडेशन कार्य करते. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामान्य लोकांची तसेच गरजूंची लाच न देता कामे झालेली आहेत. याच अँटी करप्शन फाउंडेशनच्या बीड जिल्हा कार्यकारीणी सदस्यपदी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे, सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणारे व मार्गी लावणारे सामाजिक कार्यकर्ता नुमान अली चाऊस यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष संजीव शर्मा यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगर पालिका, पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय, सामाजिक न्याय विभाग व ईत्यादी कार्यालयावल सर्व सामान्य गोरगरीब जनतेला कोणताही त्रास होऊ नये, आर्थिक हेळसांड होऊ नये, दुजाभाव होऊ नये यासाठी काम करणार असल्याची कबुली नुमान अली चाऊस यांनी दिली आहे.