*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड)मोबा.9075686100*
म्हसवड : सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व सातारा जिल्हा प्रशासन यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणे, निर्मित पद्यविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित दिग्दर्शित जाणता राजा महानाट्य साताऱ्यात होत आहे. या महानाट्याला उदंड प्रतिसाद लाभत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर दिनांक २३,२४,२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जाणता राजा हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. एक प्रवेश पत्रिकेवर एकाच व्यक्तीला प्रवेश मिळेल प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेश विनामूल्य आहे. या प्रवेशासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती सातारा या ठिकाणी विनाशुल्क प्रवेश पत्रिका म्हणजेच पासेसची सोय करण्यात आलेली आहे.
सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल विभागाच्या नायब तहसीलदार श्रीमती कदम मॅडम व सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी हे प्रवेश पत्रिका वाटप करण्याचे काम करत आहेत.
आज गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळपासून विनाशुल्क प्रवेश पत्रिका घेण्यासाठी सातारकरांनी तसेच शासकीय कर्मचारी, पत्रकार व शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकांना अगदी शांततेत व रांगेत विनाशुल्क प्रवेश पत्रिका देण्यात आलेले आहेत .हे महानाट्य जाणता राजा पाह ण्यासाठी सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, सातारा, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, पाटण, जावळी, कराड आदी तालुक्यातून लोक येणार आहेत. सातारा शहरातून व लांबून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी सातारा सैनिक स्कूल मैदान या ठिकाणी वाहन तळे उभारण्यात आलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती शिवप्रेमींना आहेच. परंतु या महानाट्याच्या माध्यमातून जिवंत देखावा व प्रसंग पाहण्यास मिळणार आहे. याचे सर्वाधिक आकर्षण तरुण पिढीला निर्माण झालेले आहे. दरम्यान,या महानाट्यामुळे संपूर्ण कुटुंब कार्यक्रमाला येणार असल्याने सातारा शहरातील व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.