Home पुणे राज्यस्तरीय प्रेम काव्यमैफल उत्साहात संपन्न

राज्यस्तरीय प्रेम काव्यमैफल उत्साहात संपन्न

162

 

पुणे: नक्षत्राचं देणं कायमंच, मुख्यालय, भोसरी पुणे ३९ च्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय प्रेम काव्यमैफलल व फुलोरा प्रेमाचा या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी कवी वादळकार यांच्या “प्रेम क्लिनिक” या थिएटर शो च्या कवितांचा कार्यक्रमही अत्यंत देखणा असा संपन्न झाला .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व गझलकार प्रा. तुकाराम पाटील होते .तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक समाजसेवक सुभाष चव्हाण उपस्थित होते. तसेच विशेष उपस्थितीमध्ये बोल्ड कवी म.भा. चव्हाण आणि सुप्रसिद्ध चित्रकार सुहास जगताप ,सौ.जया बोरकर, सिराज मुल्लानी,सुनिल जाधव, भाऊसाहेब आढाव, यशवंत घोडे इत्यादी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वृक्षाला पाणी घालून आगळ्यावेगळ्या पद्धतीने पर्यावरण संदेश देत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेस मान्यवरांना शाल, पुस्तक, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम पाटील म्हणाले की, “नक्षञाचं देणं काव्यमंच अशी एकमेव संस्था आहे की ,जी कवींच्या हक्काच्या आणि सन्मानासाठी गेले २४ वर्ष सातत्यपूर्ण काम करत आहे. या संस्थेच्या वाटचालीचा मी एक स्वतः एक साक्षीदार आहे. सातत्यपूर्ण धडपड करणारी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी ही कार्यक्षम संस्था आहे .कवींना न्याय देण्यासाठी आणि कवितेची मशागत करण्यासाठी अशा व्यासपीठाची समाजाला गरज आहे .समाजाने कवीला जपले पाहिजे. या कवितेची साधना मोठ्या स्वरूपात होण्याच्या दृष्टीने संस्था काम करत आहे. एक तास कवितेचा कवी तुमच्या भेटीला.. हा जो उपक्रम राबवत आहे .यातून अनेक भविष्यातील कवी घडतील अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. भविष्यामध्ये संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा होत आहे .या निमित्ताने अनेक अशा प्रकारचे भरीव कार्य संस्थेकडेन होणार आहे. संवेदशीलता समाजाची टिकविण्याचे काम कवींनी केले आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन आपण माणूस म्हणून जगणे स्वीकारले पाहिजे. बंधने झुगारून माणसाने प्रेमाने माणुसकी जपली पाहिजे.” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली

कार्यक्रमाचे उद्घाटक समाजसेवका सुभाष वाल्हेकर याप्रसंगी म्हणाले की ‘”कवीच्या कविता या पुस्तकात न राहता. थत्या वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे .यासाठी संस्थेने काव्यसंग्रह प्रकाशन आणि एक तास कवितेचा हा जो उपक्रम राबवला आहे .यातून नक्कीच कवींची प्रतिभा फुलत राहणार आहे. काव्य कार्यक्षमता वाढत राहणार आहे. भविष्यामध्ये नामवंत कवी या व्यासपीठाने व्यासपीठावर घडतील अशी मला अपेक्षा आहे.”

विशेष अतिथी बोल्ड कवी म.भा. चव्हाण म्हणाले की,” कवींनी आपली प्रतिभा ही जागृत ठेवून, प्रेमाचा आविष्कार हा नेहमी करत राहावा. ज्याला प्रेयसीचा स्पर्श झाला आहे .त्याची आयुष्याची बाग फुलली आहे. म्हणून या राज्यस्तरीय प्रेम काव्य मैफलमध्ये प्रेमाच्या विविध कवितांचा सादरीकरण झाले. आणि एक प्रकारे सुंदर अशा प्रकारची प्रेमाची अनुभूती मला या ठिकाणी मिळाली आहे.”

विविध विविध उपक्रमाच्या मध्ये आज सायन्स पार्क चिंचवड येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये अनेक कवींनी आपल्या प्रेम विषयावरच्या कवितांचं सादरीकरण केलं तसेच त्यांना या मैफलीत प्रेम कवितांनी रंग भरला. प्रत्येक सहभागी कवीला फोर कलर सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये अण्णा जोगदंड, भाऊसाहेब आढाव, यशवंत घोडे, डॉ.गिरीश सपकाळ,मनोज सरदार इत्यादींनी कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये पुढाकार घेतला आणि कार्यक्रम यशस्वी केला.

या प्रेम काव्य मैफलीमध्ये पद्याकर वाघरुळकर, अशोक वाघमारे,सौ अनुराधा इंगवले, नितीन भोसले, विलास कुंभार, शांताराम सोनार, सरदार मनोज, बबन चव्हाण,दत्ताञय भोसले, सौ.कमल आठवले, प्रशांत निकम, आनंद गायकवाड,संभाजी रणसिंग, बशीर मुलाणी,भरत जोशी,अशोक सोनवणे ,प्रतिभा किर्तीकर्वे इ. सादरीकरण करुन मैफलची रंगत वाढविली.

चार तास चाललेल्या या मैफलीची सांगता विश्वगीत पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी केले .आणि आभार प्रदर्शन कवी यशवंत घोडे यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here