*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*
म्हसवड :सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही प्रशासनाचे प्रमुख म्हणून सातारा जिल्हाधिकारी यांच्यावर आहे .त्यांच्याच प्रवेशद्वारा जवळ असलेल्या पोलीस ठाण्याला गेले चार महिने पाणीपुरवठा जोडणी नव्हती. ती जोडणी सातारा जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराजे साहेब व जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डूडी साहेब, पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांच्या प्रयत्नामुळे पाणीपुरवठा जोडणी लावण्यात आलेली आहे. गेली चार महिने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) युवक सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड व कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आलेले आहे.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई साहेब ,जिल्हाधिकारी श्री जिंतेंद्र डूडी साहेब, पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब या त्रिमूर्तीने काही प्रसार माध्यमातून आलेल्या बातम्यांची दखल घेऊन प्रश्न सोडवल्याबद्दल सातारा जिल्हा वासियांच्या वतीने त्यांचे व पत्रकार अजित जगताप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई गट) सातारा जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांचे आभार मानले आहेत.तसेच अनेक मान्यवरांनी धन्यवाद दिले आहेत.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्षभरामध्ये अनेक आंदोलने, मोर्चे, निदर्शने उपोषण व आत्महत्या करण्याची नोटीस देणारी कार्यकर्ते यांची रेलचेल असते .अशा वेळेला पोलीस बंदोबस्त आवश्यक असल्यामुळे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा नजीक सातारा शहर पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी उभारण्यात आलेली आहे.
या पोलीस चौकीचे चार महिन्यापूर्वी पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांनी उद्घाघाटन सुद्धा केले होते. त्यांनी सुद्धा लवकरच पाणीपुरवठा जोडणी केली जाईल असे सांगितले व शब्द पाळला आहे. खऱ्या अर्थाने राज्य सरकार गतिमान असल्याचे कृतीतून दिसून आलेले आहे. त्यामुळे राज्य सरकारवर टीका करणाऱ्या ही कार्यकर्त्यांनी गतिमान राज्य सरकार काम करत असल्याचे अनुभव घेतला आहे. हे सुद्धा सांगण्यासाठी अनेक जण पुढे आले आहेत. हीच खरी लोकशाही असल्याचे मानले जात आहे.