सातारा ,खटाव, प्रतिनिधी/ नितीन राजे.9822800812
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज आगार नेहमीच बंद पडणाऱ्या गाड्या, प्रवाशांशी उद्धटवर्तन आणि आगारातील फोन न उचलणे हे नवीन नाही असाच अनुभव रविवारी चार वाजता सुटणाऱ्या वडूज ठाणे गाडीतील महिला प्रवाशांना देखील आला. रविवारी सकाळी सकाळी नऊ 45 ला सुटणारी वडूज ठाणे गाडी वेळेवर न आल्याने रद्द झाली ही माहिती प्रवाशांना देणे हे संबंधिताचे काम असताना देखील व प्रवाशांचे मोबाईल नंबर असताना देखील त्यांना माहीत नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्या मुळे चांगलाच गोंधळ उडाला काही प्रवाशांनी चार वाजता सुटणाऱ्या वडूज ठाणे गाडी क्र MH-13 CU-8135 रविवार यासाठी आगर प्रमुखांची सही शिक्का घेऊन ते आरक्षण पुन्हा आरक्षित केले तिकीट घेतले मात्र गाडी अगोदरच दुसरे पॅसेंजरने आरक्षित झाल्याने वाद निर्माण झाला व त्यामुळे सकाळच्या आरक्षित महिला प्रवाशांना सोयीस्कर वागणूक न देता बसण्यास जागा नसल्याचे सांगून उद्धट वर्तन केले. या प्रकरणी महिला प्रवेशाने पुसेगाव पोलीस स्टेशनला गाडी नेण्यास सांगितले मात्र तसं न करता गाडी तशीच पुढे नेण्याचा प्रकार चालका करून घडला संबंधित महिलांच्या पालकांनी गाडी थांबवून गाडी पोलीस स्टेशनला येण्यास विनंती केली .गाडीमध्ये असणारे काही दारुड्यांनी अतिशय शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला. रविवार चा दिवस पुसेगाव बाजार यामुळे वाहतूकोंडीमुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून स्वतः महिलेने पालकांची समजूत काढून इतरांना त्रास होऊ नये पोलीस स्टेशनला न संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर लेखी कारवाई करा असे सांगून गाडी पुन्हा ठाण्या कडे निघाली संबंधित चालक वाहक व आगार प्रमुख यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.