✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. २० जानेवारी)
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात २० जानेवारी २०२४ रोजी कलाविष्कार स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मुंबई येथील प्रसिद्ध स्टॅंडप कॉमेडियन, मिमिक्री आर्टिस्ट व सिनेमा कलाकार जुनियर जॉनी लिव्हर यांच्या शुभहस्ते थाटात संपन्न झाले.
या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सचिव डॉ. यादवरावजी राऊत यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. माधवराव कदम, उपप्राचार्य प्रा. डॉ. विजय कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रवीण गुजर, प्रा. डॉ. धनराज तायडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अभय जोशी उपस्थित होते.
जुनियर जॉनी लिव्हर यांनी वेगवेगळ्या कलाकार, विमान, पक्षांचे आवाज काढून मिमिक्री केली व विद्यार्थ्यांना खूप हसविले, त्यांनी सांगितले की, वेगवेगळे आवाज काढण्यासाठी आपला घसा चांगला राहणे आवश्यक आहे, मी माझ्या आयुष्यात एकदाही सुपारी किंवा घुटका खाल्लेला नाही व त्यामुळे इतरांना हसवू शकलो.
तरी तुम्ही कोणीच पान, सुपारी, खर्रा खाऊ नये, असा व्यसनमुक्तीचा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला, त्यांनी असे सांगितले की, जेव्हा आपण सेल्फी घेतो किंवा फोटो घेतो तेव्हा फोटोसाठी सेकंदासाठी हसतो व आपला फोटो खूप सुंदर निघतो तसेच आपण आयुष्यात नेहमीच हसत राहून आपले आयुष्य सुंदर करावे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांनी प्रास्ताविकातून ज्ञान व संस्कार देण्याचे कार्य आपल्या महाविद्यालयात केले जाते असे प्रतिपादन केले.
या दोन दिवसाच्या स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम आनंद मेळावा, निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी, मेहंदी, डिश डेकोरेशन स्पर्धा, भावगीत व फिल्मी गीत, समूह गीत व संगीत फिश पौंडचे आयोजन करण्यात आले.क्रीडा स्पर्धा, लोकनृत्य व एकल नृत्य स्पर्धा घेण्यात आली.
बक्षीस वितरण, शेलापागोटे कार्यक्रमानंतर या सोहळ्याची सांगता झाली.
स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम यांच्या मार्गदर्शनात उपप्राचार्य डॉ. व्ही. पी. कदम, डॉ. डी. व्ही. तायडे, डॉ. एस. आर. वद्राबादे, प्रा. डॉ. बी. एम. सावरकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. एम. गुजर, पर्यवेक्षक प्रा. बी. यु. लाभसेटवार, अधीक्षक साहेबराव कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अभय जोशी, प्रो. डॉ. पी. वाय. अनासाने, प्रा.ए.पी.मिटके व सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.