*अमरावती प्रतिनिधी!*
*स्वप्निल गोरे*
*(8767308689)*
12 जानेवारी 2024 रोजी अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या मराठी विभागामार्फत स्वामी विवेकानंद व तसेच माता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जनार्दन काटकर सर, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. संजय लोहकरे सर तसेच प्रा. गणेश पोकळे सर आणि प्रा. दिनेश डूडूल सर आणि प्रा. विद्या शेंडे मॅडम , प्रा.तृप्ती बेलसरे मॅडम इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते.
सदर आयोजित कार्यक्रमांमध्ये कविता, भाषण, एकांकिका अशा विविध कलागुणांनी स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ यांना मानवंदना दिली.
यामध्ये अमरदिप कलाने, तेजस भागवत,अक्षय चव्हाण,मयूर कट्यारमल,विक्रम चक्रे,स्वप्निल गोरे, मनीषा राठोड, दिव्यानी राऊत,दिपाली भुसारी, प्रियंका इंगळे, राधिका सगणे,प्रीती पयघन, काजल बरडे, पल्लवी मेश्राम,पायल खवसे इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय तायडे प्रास्ताविक श्रद्धा बारबुद्धे व आभार प्रदर्शन दशरथ कुरुडे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच मराठी विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.