


नांदुरा : तालुक्यातील ग्राम वडनेर भोलजी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार यांना त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्धसेवाश्रम आयोजित दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय “निर्भिंड पत्रकारिता” पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला आहे. रविवार दि.७ जानेवारी २०२४ रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज, जि. सांगली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मा. आमदार सुधीर दादा गाडगीळ, मा. विशाल लोंढे आयुक्त समाज कल्याण पुणे, मा. हरखचंद सावला, मा. ज्योती पाटील निवासी उपजिल्हाधिकारी तथा उप दंडाधिकारी सांगली, मा. प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधीक्षक मिरज विभाग, मा. अविनाश पाटील पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे कुपवाड, संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष हिंदरत्न दिपक लोंढे ( साहित्यिक समाजसेवक ) अनाथांची नाथ समाजसेविका मा. शारदा लोंढे अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक ,वैद्यकीय ,क्रीडा, उद्योग पत्रकारिता आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्धसेवाश्रम च्या वतीने पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. सामाजिक जाणीवतेचे भान ठेवून समाजात समाजाच्या प्रबोधनासाठी पत्रकार म्हणून काम करणारे युवा शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तायडे यांना दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय “निर्भिंड पत्रकारिता” पुरस्कार २०२३ देऊन गौरविण्यात येणार आहे. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल सिद्धार्थ तायडे यांचेवर नातेवाईक, मित्रमंडळी आणि हितचिंतक अशा अनेक क्षेत्रांतून अभिनंदनचा व पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.













