Home नागपूर संविधान सामान्यज्ञान स्पर्धेचे पुरस्कार जाहीर

संविधान सामान्यज्ञान स्पर्धेचे पुरस्कार जाहीर

163

 

नागपूर- उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव बोरी येथे नवीन वर्ष २०२४ , २०६ वा भीमा – कोरेगाव शौर्य दिन व देशातील पहिली मुलिंची शाळा सुरूवातीचा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमातच जोतीराव सावित्रीमाई फाउंडेशन २०२० नागपूरच्या अनुषंगाने संविधान दिवस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या संविधान सामान्य स्पर्धेचे २०२३चे पुरस्कार जाहीर झाले.

उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव बोरी पंचायत समिती नागपूर येथून प्रथम क्रमांक अभिषेक प्रमोद खापणे, द्वितीय क्रमांक जानवी श्रावण वाघमारे यांनी पटकावला. मुरारी करिअर मोहपा येथील प्रथम क्रमांक राजलक्ष्मी लक्ष्मण हाडोले हिने पटकावला. तर यवतमाळ जिल्ह्यातील उ. प्राथमिक शाळा मोहदरी येथील प्रथम क्रमांक अश्विनी गजानन मोहुर्ले हिला मिळाला. प्राथमिक शाळा टेंबरी येथील कुमारी अनुष्का अशोक पाटील हीचा प्रथम क्रमांक आला. तर नागभीडच्या अक्षरा अनमोल शेंडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. वर्धा जिल्ह्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बांगडापूरच्या कुमारी बरखा प्रवीण नेणारे हिने प्रथम क्रमांक पटकावला. संविधान सामान्य स्पर्धेचे बक्षीस वितरण केंद्रप्रमुख वनमाला डोकरीमारे मॅडम, फाउंडेशनचे अध्यक्ष हिरामण तेलंग, सचिव संदीप गायकवाड, सहाय्यक शिक्षक रवींद्र तिमांडे , सन्माननीय शंभरकर सर, सन्माननीय फुलझले सर यांच्या हस्ते पार पाडण्यात आला.
ही परिक्षा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष कांचन मनोज पाटील, शैलेश हातबुडे ,महेंद्र मेश्राम, दिलीप लोहकरे हातभार लावला .परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन सचिव संदीप गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन स.शि. तिमांडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here