जगदीश का. काशिकर,
मो. ९७६८४२५७५७
मुंबई:- नागपुरात काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिवस पार पडला. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संबोधित केलं. यावेळी “राजा, महाराजांनी स्वातंत्र्याची लढाई लढली नव्हती. त्यांनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी केली होती,” असं विधान राहुल गांधींनी केलं. यावरून सेंगर राजघराण्याचे वंशज अजय सिंह सेंगर यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
यावर बोलताना “सेंगर जालौन ” राजघराण्याचे वंशज अजय सिंह सेंगर म्हणाले, “1812 मध्ये जेव्हा सेंगरांनी ब्रिटीश कारवायांचा विरोध केला तेव्हा कर्नल मार्टिनडेल त्यांना थोपवण्यासाठी शिपायांच्या तुकडीसह आले.सेंगरांनी ग्रेट डेक्कन रोडवर कूच करणार्या शिपायांवर हल्ला केला आणि अनेक मारले गेले. त्यानंतर सेंगरांनी शौर्य गाजविले. योद्धा म्हणून सेंगरांची ख्याती लोदी युगात उद्भवली, जेव्हा त्यांनी दिल्ली सल्तनती विरूद्ध त्यांच्या प्रदेशांचे रक्षण केले आणि बाबरशी युद्ध केले.एकोणिसाव्या शतकात लखनेसर आणि बलिया या भागात त्यांचे जमिनीचे हक्क आणि प्रादेशिक राजवट कायम ठेवत त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला. पुढे सेंगर म्हणतात की हिन्दूस्थानातिल अनेक 567 क्षत्रिय राजघराण्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. पण, राहुल गांधींनी सांगितलं, ‘देशातील राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली होती.’ अशाप्रकारे क्षत्रिय राजघराण्यांचा अपमान करणं अतिशय चुकीचं व देशद्रोही वक्तव्य आहे. मला वाटतं हे महाराष्ट्र आणि देशात कुणी सहन करणार नाही,देशातील राजांनी भारत देश स्वतंत्र झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता भारत देशात सामील झाले, आपली हजारो एकर भूमी, किल्ले, राजवाडे या देशात समर्पित केले. या देशाकरिता प्राणाचे बलिदान व त्याग समर्पित करणाऱ्या क्षत्रीय राजा महाराजांच्या अपमान करणे योग्य नाही. क्षत्रिय राजघराणे भारतात सामील झाले तेव्हा कुठे या देशाच्या नकाशा – सीमा या प्रचंड मोठ्या दिसतात. राहुल गांधी यांनी या प्रकरणी माफी मागावी अन्यथा त्यांना देशात फिरू दिला जाणार नाही असे सेंगर म्हणतात.