Home अमरावती मनुवादी प्रवृत्ती बहुजन समाजाला आजही छळत आहे-प्रा. श्रीकृष्ण बनसोड मरार...

मनुवादी प्रवृत्ती बहुजन समाजाला आजही छळत आहे-प्रा. श्रीकृष्ण बनसोड मरार माळी समाजातील सत्कार समारंभ व उपवर युवक-युवती परिचय मेळावा संपन्न.

192

 

अमरावती ( प्रतिनिधी )
स्थानिक मरार माळी बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने अमर शहीद लिखीरामजी कावरे (भूतपूर्व मंत्री मध्यप्रदेश ) यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मनुस्मृती दहन दिनी मरार माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव-ज्येष्ठ नागरिकांचा भावपूर्ण सत्कार व उपवर युवक-युवती विवाह इच्छुकांच्या परिचय मेळाव्याचे विदर्भ क्षेत्रीय माळी शिक्षण संस्थेच्या प्राचार्य टी.व्ही. वऱ्हेकर सभागृह,अमरावती येथे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गुलाबराव माने(वर्धा),उद्घाटक समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड प्रमुख अतिथी रामचरण माने (भोपाळ), कोषाध्यक्ष शंकरराव आचरकाटे,गणेशराव टिके (भटोरी),बहादुरसिंग पंचारे (वर्धा ),लेखरामजी कावरे (नागपूर), दयाराम मान, रामकिशोर शिंगणधुपे(दहेगाव), संतोष कावरे (किरणापुर मध्यप्रदेश),सिताराम सैनी (बालाघाट मध्य प्रदेश),विनायक खैरे (गोंदिया),प्रा.अरुण बुंदेले (समाजप्रबोधन कर्ते),सुरेशराव नागफासे,अविनाश नागफासे, उद्योजक दयाराम नागफासे, उत्तमराव नागपासे,बहादुरसिंग पचारे,प्रकाशराव देहगुजर (यवतमाळ),ज्ञानेश्वर सहारे, रामलाल म्हात्रे (सरपंच
म्हसणी), बबनराव टिके, फिरोसकुमार पाचे, माणिकराव पाचडे,प्रकाश टिके(कारंजा) होते.
अध्यक्ष, प्रमुख अतिथी यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले आणि समतेची ज्योत प्रज्वलित करून उद्घाटन केले.
लेखक,समाजप्रब्रोधकर्ते , अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी क्रांतिकारी वंदनगीत व ” महात्मा फुले” या स्वरचित अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
—–
उद्घाटनपर भाषणातून समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड म्हणाले की,मरार माळी समाजासह बहुजन समाजाला आजही मनुवादी प्रवृत्ती छळत आहे.त्यांना धर्मांधता व अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून ठेवले आहे.त्यांना फुले – शाहू-आंबेडकरांचे विचारच गुलामगिरीतून मुक्त करू शकतात.युवा पिढीने भारतीय लोकशाहीला वाचवण्यासाठी राजकारणात उडी घेण्याची आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा लाभ आजच्या तरुणांनी घेण्याची गरज आहे .”असे विचार व्यक्त केले.

समाजाचा वेळ अर्थ व श्रम
वाचण्यासाठी उपवर मुला- मुलींच्या परिचय मेळाव्याची गरज
– मा.गुलाबराव माने

अध्यक्षीय भाषणातून मा.गुलाबराव माने (वर्धा )यांनी “उपवर युवक युवतींच्या अशा प्रकारच्या परिचय मेळाव्याची समाजाला गरज आहे कारण मुलं-मुली बघण्यामध्ये समाजाचा जो वेळ,अर्थ आणि श्रम खर्च होतो ते होणार नाही व योग्य उपवर वधू – वरांची निवड करता येते,असे प्रतिपादन केले.”
—-
ऋणानुबंध या उपवर युवक युवती परिचय महामेळाव्याला समाजाची उपस्थिती आवश्यक
– मा.रामकुमार खैरे

प्रास्ताविक भाषणातून संस्थेचे अध्यक्ष मा.रामकुमार खैरे यांनी” भारतातील सर्वाधिक नोंदणी झालेल्या २८ व्या बहुराज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज व युवक युवती ऋणानुबंध परिचय महासंमेलनाला रविवारी दि .७ जानेवारी २०२३ ला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह अमरावती येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.”
—-
” आजच्या विद्यार्थ्यांनी म.फुले व डॉ.आंबेडकरांचे विद्यार्थीजीवन अंगीकारणे आवश्यक ”
– प्रा.अरुण बुंदेले

प्रमुख अतिथी प्रा.अरुण बुंदेले यांनी ” थोरांच्या विद्यार्थी जीवनातील ज्ञानकणांचा उपयोग करून आजचा विद्यार्थी आदर्श बनू शकतो व या आदर्श विद्यार्थ्यांचा म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा आज येथे सत्कार समाजातर्फे सत्कार होत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण सत्कार हे विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणा देतात. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यार्थी जीवनातील ज्ञानकण
अंगीकारून स्वतःचे विद्यार्थी जीवन सफल करावे.” असे विचार व्यक्त केले .
याप्रसंगी मरार माळी बहुउद्देशीय विकास संस्था व क़ै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील समता सैनिक प्रा.अरुण बुंदेले व सुप्रसिद्ध विदुषी प्रा.डॉ.सौ.उज्ज्वला सुरेशराव मेहरे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संतोष कावरे (सोनपरी मध्यप्रदेश ),किशोर शिंगणधुपे(दहेगाव),सिताराम सैनी(बालाघाट मध्य प्रदेश), लेखरामजी कावरे,शामराव
नागफासे (नागपूर ),प्रकाश देशमुख(यवतमाळ)इत्यादींनी मार्गदर्शनपर भाषणातून सामाजिक बांधिलकीची गरज व्यक्त केली.
श्री बाळाभाऊ मठठा यांनी आभार प्रदर्शन तर डॉ.उज्ज्वला मेहेरे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील मरार माळी समाजातील अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्वश्री रामलाल खैरे, शंकरराव आचारकाटे,सुभाष पाचेकर,संजय म्हात्रे,रेखा खैरे, राणी मठ्ठा,रोशन खैरे, अशोक बाहे,भारत शिंगण धुपे, सुनील बाहे,रामेश्वर बाहे,संदीप अंबादास पाचडे, रूपराव खैरे, रामदास टिके,बळीराम दंदे,पुरण कावरे, देविदास हाडागुडे,जगन्नाथ नागफासे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here