Home महाराष्ट्र भारती रविंद्र पाटील यांची MPSC मार्फत दुय्यम निबंधक श्रेणी – १ पदी...

भारती रविंद्र पाटील यांची MPSC मार्फत दुय्यम निबंधक श्रेणी – १ पदी निवड- संभाजी ब्रिगेड च्या वतीने सत्कार

405

 

धरणगाव प्रतिनिधी — पी.डी.पाटील सर

धरणगाव — माजी जि.प.सदस्य तथा बाजार समितीचे संचालक रविंद्र भिलाजी पाटील यांची कन्या भारती रविंद्र पाटील यांची MPSC मार्फत दुय्यम निबंधक श्रेणी – १ पदी निवड झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
रवि दादा हे नाव उच्चारल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच वाक्य येतं ते म्हणजे ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’. वडिलांच्या लौकिकाला साजेल अशी दैदिप्यमान कामगिरी करून भारती दिदीने नवा आदर्श प्रस्थापित केला. रवि दादांनी जीवनात पैसा, धनसंपत्ती याला कधीही महत्व दिले नाही मात्र व्यक्तींना महत्व देऊन जिवाभावाची माणसं कमावली. याचा प्रत्यय दादांची कन्या भारती पाटील यांची दुय्यम निबंधक म्हणून निवड झाल्यावर आला. स्व अध्ययन करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत दुय्यम निबंधक श्रेणी -१ (Sub Registrar/Stamp Inspector/Marriage Registrar/Attorney general) पदी निवड झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या वतीने भारती ताई व त्यांचे वडील रविंद्र भिलाजी पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगगर अध्यक्ष संदीप पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, उपाध्यक्ष मयूर चौधरी, तालुकाध्यक्ष प्रफुल पाटील, पं.स. धरणगाव चे दिनेश भदाणे यांच्यासह सुनिल रघुनाथ पाटील, संभाजी भालेराव पाटील, विकास काळू पाटील, कैलास पाटील निसर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here