Home महाराष्ट्र पर्यंत्ती दुहेरी हत्याकांडात पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा नाही ; म्हसवड पोलीस स्टेशनची...

पर्यंत्ती दुहेरी हत्याकांडात पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा नाही ; म्हसवड पोलीस स्टेशनची यंत्रणा हतबल

165

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड :
माण तालुक्यातील म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील पर्यंती, ता . माण,जि. सातारा येथे माय लेकीचा रात्रीच्या सुमारास दोरीने गळा आवळून खून झाल्याची घटना घडून दोन दिवस उलटले असून अद्याप ही पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नाहीत त्यामुळे म्हसवड पोलीस स्टेशनची संपूर्ण यंत्रणा हतबल झाल्याचे पहायला मिळाले.
बुधवारी मध्यरात्री पर्यंती ग्रामपंचायत शेजारी असणाऱ्या (संपताबाई लक्ष्मण नरळे वय-७५) आणि नंदूबाई भिकू आटपाडकर(वय-५८) यांचे अज्ञात व्यक्तींनी दोरीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली याबाबत घरच्यांनी पोलीस पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी म्हसवड पोलीस ठाण्यात याबाबतची खबर दिल्यानंतर म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचेही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते श्वानपथक, फॉरेन्सिक लॅबची टीम यावेळी उपस्थित होती.
यावेळी श्वानाने मागोवा काढत नजिकच्या मुल्ला वस्तीपर्यत श्वान पोहोचले परंतु त्यांनापण अज्ञात मारेकरयाचा मागोवा काढण्यात अपयश आले फॉरेन्सिक टीमच्या हाती पण काही लागले नसल्याची माहिती मिळत आहे.
आज उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी घटना स्थळी भेट दिली आणि तपासाची दिशा कोणत्या मार्गनी चालू आहे यांचा आढावा घेतला परंतु तपासात काहीच निष्पन्न झाले नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. मारेकऱ्यांनी अत्यन्त शिताफिने हे हत्याकाड घडवून आणल्याने पोलीस यंत्रणे पुढे मोठे आव्हान उभे राहिल्याचे दिसत आहे.
काही महिन्यापूर्वी असेच हत्या कांड घडले होते आणि पर्यंत्ती मध्ये दुसरे दुहेरी हत्याकाड घडल्यामुळे पर्यंती गावातील जनतेमध्ये भीतीचे सावट असून या हत्या कांडाचा तपास पोलीस यंत्रणा कधी लावणार आणि या माया लेकीच्या मारेकऱ्यांना कधी जेर बंद करणार असा सवाल पर्यंत्ती गावातील नागरिक करत आहेत.
प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विभुते यांनी मारेकऱ्याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल. असा विश्वास दिला असला तरी मारेकरयाचा शोध घेण्यास पोलीस यंत्रनेला येत असलेल्या अपयशमुळे गावात उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. पोलीस यंत्रनेने आपले अपयश लपवू नये पोलीस यंत्रनेने आपल्या तपासास अधिक गती देऊन लवकरात लवकर मारेकऱ्यांचा शोध घ्यावा अशी जनतेतून मागणी जोर धरत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here