सातारा (खटाव), प्रतिनिधी/ नितीन राजे 9822800812
सातारा- महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा रथोत्सव सोहळा १० जानेवारीला संपन्न होत असून आहे. श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ७६ वे यात्रा प्रदर्शन दि. ६ ते १६ जानेवारीदरम्यान मोठ्या दिमाखात भरवण्यात येईल. यंदा तिथी अन् तारखेनुसार ‘संजीवन समाधी दिवसाचा योग’ आल्याने यात्रेचे स्वरूप व्यापक व शानदार असून राज्यातील दहा दिवस भरगच्च कार्यक्रम अस णारी यात्रा म्हणून पुसेगाव चे नाव लौकिक असल्याची माहिती देवस्थानचे मठाधिपती १०८ श्रीमहंत सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव यांनी दिली.
येथील श्री सेवागिरी महाराज मंदिरात कार्यक्रम पत्रिका व श्री सेवागिरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने, ट्रस्टचे माजी चेअरमन, विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त ११ दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दि. ६ जानेवारीला मानाच्या झेंडा मिरवणुकीने यात्रेस प्रारंभ होईल. दि३ ते ६ जानेवारीदरम्यान भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ६ व ७ जानेवारीला गावातील श्री हनुमानगिरी हायस्कूलच्या मैदानावर अखिल भारतीय दिवसरात्र शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा होतील. दि. ८ जानेवारीला जंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे.
दि. ९ जानेवारीला प. पू. नारायणगिरी महाराज यांच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. या आखाड्यात ५१ रुपयांपासून १ लाख ५१ हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्याहोणार आहेत. दि. १० जानेवारीला यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची फुलांनी व नोटांच्या माळांनी सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढली जाईल. दि. ९ ते १४ जानेवारीदरम्यान ‘राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी प्रदर्शन जानेवारी २०२४’ भरवण्यात येईल. दि. ११ जानेवारीला सायंकाळी ५ ते ८.३० या वेळेत ‘भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा भूपाळी ते भैरवी
मनोरंजनाचा कार्यक्रम होईलदि. १२ जानेवारीला सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत श्री सेवागिरी खुला युवा महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
दि. १२ व १३ जानेवारीला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होईल. दि. १३ जानेवारीला सकाळी ११ वाजता श्वान प्रदर्शन होईल. दि. १४ जानेवारीला पहाटे ५ वाजता श्री सेवागिरी मॅरेथॉन स्पर्धा तर सकाळी ११ वाजता श्वान शर्यत होईल. दि. १५ जानेवारीला सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम होईल तर याच दिवशी बँड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ जानेवारीला बक्षीस जनावरांची नोंद केली जाईल. दि. १६ जानेवारीला बक्षीसप्राप्त जनावरांची निवड आणि वक्षीस वितरण समारंभ होणार आहे.