Home चंद्रपूर रोशन कुमार पिलेवान यांना उत्कृष्ट पुस्तक परिचय पुरस्कार जाहीर

रोशन कुमार पिलेवान यांना उत्कृष्ट पुस्तक परिचय पुरस्कार जाहीर

138

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक मो. 88886 28986

ब्रम्हपुरी:- वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य या समुहांतर्गत मराठी वाचक व लेखकासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात.
त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे उत्कृष्ट पुस्तक परिचय स्पर्धा होय. लेखक हे वाचन केलेल्या वेगवेगळ्या सहित्यांवर परिचय अर्थात छोटेखानी परिक्षण अथवा समिक्षण लिहितात.
वाचकांच्या प्रतिक्रिया आणि तज्ञ परीक्षक समितीच्या गुणदानातून उत्कृष्ट पुस्तक परिचयकर्त्याची निवड केली जाते.
यंदाचा उत्कृष्ट पुस्तक परिचय पुरस्कार हा सचिन बेंदभर पाटील यांचेसह रोशनकुमार शामजी पिलेवान चंद्रपूर यांना जाहीर झाला आहे . सुनील पोटे, राजुरा यांच्या “आंबिल ” या कविता संग्रहावर लिहिलेल्या परिक्षणासाठी रोशन कुमार यांना हा पुरस्कार दिला जात आहे . 10 डिसेंबर 2023 रोजी पुणे येथे अरुण देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे.
या पुरस्कराबद्दल लेखक , कलावंत आणि शिक्षक , आयोजक यांनी रोषणकुमार पिलेवान यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here