Home यवतमाळ उमरखेड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कॅन्डल मार्च रॅली काढून...

उमरखेड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कॅन्डल मार्च रॅली काढून हजारो अनुयायांनी केले अभिवादन

249

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 6 डिसेंबर) शहरातील मुख्य वार्ड म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील सम्यक बुद्ध विहार येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी
कॅन्डल मार्च रॅली काढून हजारो अनुयायांनी केले अभिवादन…!

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजाचे अर्धवट ध्वजारोहण हिराबाई दिवेकर माजी नगरसेविका उमरखेड यांच्या हस्ते करण्यात आले.

तर लगेच पंचशील ध्वज गीत रमामाता महिला मंडळांनी सादर केले.

त्यानंतर विहारामध्ये कु.समृद्धी आनंद दिवेकर व कु. ऋतुजा मुकेश दिवेकर ह्या मुलींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त केले.

तर सायंकाळी 6:30 वाजता “महापरिनिर्वाण दिनी” भव्य दिव्य कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली.

सदर रॅली ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड ते नाग चौक, बस स्टँड समोरून, माहेश्वरी चौक, छ.शिवाजी चौक मधून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ हजारो कॅन्डल्स लावून संपन्न झाली.

या कार्यक्रमाचे आयोजन रमामाता महिला मंडळ, भिम टायगर सेना तसेच प्रफुल दिवेकर, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर इतर अनेक समाज बांधवांनी केले होते.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन करण्याकरिता हजारोच्या संख्येने जनसमुदाय उसळला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here