Home महाराष्ट्र मुळावा परिसरातील रेती तस्कर सक्रिय होण्याच्या मार्गावर

मुळावा परिसरातील रेती तस्कर सक्रिय होण्याच्या मार्गावर [रेती तस्करां कडून पैनगंगा नदीवरील अनेक रेती घाटाची पाहणी सुरू]

185

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 21 नोव्हेंबर) गेल्या दोन वर्षापासून रेती घाट लिलाव बंद असल्यामुळे रेती तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सामान्य गरीब नागरिकांना मात्र याचा मोठा फटका बसत असून
रेती तस्कर दहा ते बारा हजार रुपये ट्रिप ने रेती विकत आहेत. यामुळे गरीब नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.

मुळावा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती तस्कर सक्रिय झाले असून कोणत्या रेती घाटावरून कशी रेती चोरायची याची चाचपणी चालू झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून पैनगंगा नदीपात्रा मधून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करून हे रेती चोर मालामाल झाले आहेत.
यावर्षी सुद्धा पैनगंगा नदी पात्रातील रेती तस्करी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या रेती तस्करा कडून अनेक रेती घाटाची पाहणी चालू आहे. त्यामुळे या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्या साठी पोलीस व महसूल विभागाने पथके तयार करून अवैध रेती तस्करीवर आळा घालतील का….? की दरवर्षी प्रमाणे जाणीवपूर्वक आर्थिक दुर्लक्ष करतील हे येणाऱ्या काही दिवसात कळेल.

या रेती तस्करांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नसल्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.

रेती घाटाचीच चोरी होत असल्याने महसूल,आणि पोलीस कर्मचारी रेती माफियांच्या वेसणीला बांधले जातात की काय असा प्रश्न देखील उपस्थित होतो.

अवैध वाहतुकीमुळे गावातील नागरिकांना सुद्धा रेती तस्करांच्या वाहनाच्या कर्कश आवाजामुळे त्रास होतो. त्यांची झोप मोड होते रात्रीच्या सुमारास अपघाताची शक्यता सुद्धा बळावते त्यामुळे या रेती टास्करांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

चौकट-: मुळावा येथील एका माजी सरपंचाच्या शेता जवळील रेती घाटावर मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे.
त्या माजी सरपंचा कडून रेती ट्रिप प्रमाणे विकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

रेती तस्कर आणि माजी सरपंच यांच्यात बोलणी सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे या रेती तस्करांचा बंदोबस्त उमरखेडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार व पोफाळी पोलिस स्टेशनचे तडफदार ठाणेदार करतील का हे येणाऱ्या काही दिवसात कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here