ब्रहापूरी तालुका प्रतिनिधी :- आजच्या धकाधकीच्या जीवनात दिसत आहेत. नाते सबंधीही दुरावा, आपुलकी, प्रेम, सहकार्य या भावना कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे विवाह सबंध प्रस्थापित करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. मुला मुलींच्या विवाह जुळवा यासाठी पालक वर्ग चिंतातुर असतात. मुला मुलींच्या विवाहासाठी योग्य स्थळ मिळावे. परिचय वाढवा.विचाराची आदानप्रदान व्हावे आणि योग्य जोडीदार मिळून वैवाहिक जीवनास चांगली सुरुवात करावे सर्वांचे कल्याण व्हावे.तसेच मेळाव्याला येणाऱ्या मुला मुलींना डॉक्टर, वकील, इंजिनियर, सरकारी, निमसरकारी,प्रोपेसर शिक्षक, मॅनेजर व्यावसायिक, घटस्फोटित, विधुर, विधवा, समाजातील अनेक क्षेत्रातील स्थळे एकच ठिकाणी भेटावे परिचय व्हावा, या उद्देशाने रॉयल बुध्दीझम मॅट्रिमोनी तर्फे दिनांक १९नोव्हेंबर २०२३ रोज रविवारला सकाळी १० वाजता राजीव गांधी सभागृह कुरझा रोड ब्रम्हपुरी येथे भव्य विदर्भ स्तरीय बौद्धधम्मीय वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या बौद्धधम्मीय वर वधू परिचय मेळाव्यात इच्छुक सहभागी होणाऱ्या बांधवांनी राजेश मेश्राम मोबाईल क्रमांक ७०३०२८१५९०,९२८४३२०२७९ संपर्क साधून लवकरात लवकर आपले नाव मिळवावे तसेच या मेळाव्यात जास्तीत जास्ती संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राजेश मेश्राम, सचिन कऱ्हाडे,प्रशांत डांगे, डेव्हिड शेंडे,नरेश रामटेके, पदमाकर रामटेके,आशिष कोसे,सूरज मेश्राम, राजेश माटे,सोनू बागडे,प्रशांत वालदे,जयंत शेंडे,राजेश वंजारी, विशाल अंबादे,भारत मेश्राम यांनी केले आहे.