Home नागपूर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे नागपूर दीक्षाभूमीवरील स्टालचे उद्घाटन

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे नागपूर दीक्षाभूमीवरील स्टालचे उद्घाटन

179

 

नागपूर- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 आक्टोबर 1956 ला अशोका विजयादशमी दीनी नागपूर येथील दीक्षा भूमी वर आपल्या लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने नागपूर दीक्षा भूमी चौकातील सामाजिक न्याय भवनाच्या गेट समोरील परिसर ,येथे संघटनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने जनजागृती स्टाल लावण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, संघटनेचे संस्थापक स्मृतीशेष श्रीकृष्ण उबाळे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या नंतर स्टालचे उद्घाटन आणि बीईएफ समाचार धम्मचक्र विशेषांक 2023 चे विमोचन लक्ष्मीनारायन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एल.आय.टी.) कालेज नागपूर येथील प्रोफेसर डॉ.प्रा‌.सिद्धार्ध मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर न्याशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स बानाईचे नागपूरचे माजी अध्यक्ष इंजिनिअर परूळकर उपस्थितीत २३आक्टोबर २०२३ला संपन्न झाले.अध्यक्षस्थानी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे हे होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ.प्रा.टी.डी.कोसे, राज्याचे अध्यक्ष प्रा.शेषराव रोकडे , राज्याचे उपाध्यक्ष चैनदास भालाधरे राज्याचे कोषाध्यक्ष प्रा.अशोक ठवळे, राज्याचे सहसचिव नरेश मुर्ती आणि शिवदास कांबळे, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुजय वानखेडे, जिल्हा सहसचिव सुभाष नवघरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ .प्रा‌ ‌टी डी .कोसे यांनी तर आभारप्रदर्शन राज्याचे सहसचिव शिवदास कांबळे यांनी केले‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here