Home महाराष्ट्र मनोज जरंगे- पाटील यांची दहिवडी येथे जाहीर सभा; सभेची जय्यत तयारी सुरु

मनोज जरंगे- पाटील यांची दहिवडी येथे जाहीर सभा; सभेची जय्यत तयारी सुरु

129

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

म्हसवड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटी मधून आंदोलनाचे रणशिंग फुंकलेल्या मनोज जरांगे -पाटील यांची शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता दहिवडी येथे जाहीर सभा होत आहे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जरांगे -पाटील यांची तोफ धडाडणार असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्याचे लक्ष सभेकडे लागले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला विषय मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनाने पुन्हा समोर आला त्यामुळे सरकार ख डबडून जागे झाले आहे आरक्षण अंतिम टप्प्यात आले आहे या चळवळीला मूर्त स्वरूप यावे यासाठी जरांगे – पाटील समाज बांधवांच्या भेटीसाठी राज्यभर सभा घेत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दहिवडीत सभा होत आहे त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव भगिनी उपस्थित राहणार असून त्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे त्यानुसार सभेची जोरात तयारी सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here