पुणे -विदयार्थी घडवण्यामागची शिक्षकांची मेहेनत व वचनबद्धतेची दखल घेत दरवर्षी पुणे व आसपासच्या शाळा, मुख्याध्यापक व शिक्षक यांचा गौरव भाजप एज्युकेशन सेल, पुणे तर्फे नीव पुरस्कार देऊन करण्यात येतो. या वर्षी ८० विविध शाळा तसेच २०० हुन अधिक शिक्षक व मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत नीव पुरस्काराचे वितरण माजी आमदार जगदीश मुळीक, भाजपा, पुणे शहर अध्यक्ष, धीरज घाटे व शहर भाजपा सरचिटणीस गणेश घोष यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने जागतिक चळवळीच्या अनुषंगाने, केशव सीता ट्रस्टच्या सहकार्याने ‘प्लास्टिक महामारी’ हा गो ग्रीन उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे कार्यक्रमाच्या आयोजिका सीमा तंवर यांनी सांगितले.
या वर्षीचा नीव जीवनगौरव पुरस्कार ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या क्लस्टर प्रिन्सिपल रुपाली ढमढेरे , ऑर्किड स्कूलच्या संस्थापक संचालक लक्ष्मी कुमार, ऑर्बिस स्कूलच्या संचालक गुंजन श्रीवास्तव , डॉ .डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. रेखा पाठक, . सी.पी.गोएंका इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ, रश्मी गुप्ता ,सुंदरजी ग्लोबल अकादमीच्या संचालिका मसरत तवावाला, एनार्क एज्युकेशनच्या सहसंस्थापिका पूर्णिमा शेट्ये, अमनोरा स्कूलच्या मुख्याध्यापिका मधुलिका शर्मा यांना देण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनार्क एज्युकेशन, सेरा डिजिटल लर्निंग, गिफ्ट पार्टनर्स-POR DIOS, हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स- IIBM, सपोर्ट पार्टनर्स- अनिशान एज्युकेशन आणि क्युरियस लर्नर्स यांचे सहकार्य लाभले.