Home महाराष्ट्र शिवधर्म फाउंडेशनची माण तालुका कार्यकारणी जाहीर ;सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्षांचे आवाहन.

शिवधर्म फाउंडेशनची माण तालुका कार्यकारणी जाहीर ;सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्षांचे आवाहन.

841

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड : दहिवडी ता.माण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माण तालुका कार्यकारणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान माण तालुक्यातील शासकीय कार्यालय यामध्ये नागरिकांची होणारी पिळवणूक,महिलांवर होणारे अन्याय,अत्याचार सर्व सामान्य लोकांवर राजकीय बळाचा वापर करून होणारा अन्याय यावर आवाज उठवून सर्वसामान्यांना न्याय देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी माण तालुकाध्यक्ष योगेश पोळ,कार्याध्यक्ष धिरेनकुमार भोसले,उपाध्यक्ष विक्रम कदम,सचिव विशाल कट्टे,उपसचिव किरण देवकर, सरचिटणीस समाधान ठोंबरे,संघटक विशाल काटे,सहसंघटक संदेश आवटे,सामाजिक उपक्रम विभाग प्रमुख करण देवकुळे,कायदेशीर सल्लागार विशाल काळे,दहिवडी शहर महिला प्रमुख प्राजक्ता पवार,सोशल मीडिया प्रमुख विकास तोरसे यांना नियुक्तीपत्र देऊन माण तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्यानंतर पै.दिपक काटे यांनी व्हिडीओ कॅान्फरन्सद्वारे संघटनेची ध्येय,धोरणे समजावून मार्गदर्शन करुन नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष रविकिरण पोळ म्हणाले की,शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात.कोणत्याही सामाजिक अडचणीत सर्वसामान्यांसाठी चळवळ उभा करण्याच्या दृष्टीने संघटनेची स्थापना संस्थापक अध्यक्ष पै.दिपक काटे यांनी केली आहे संघटनेने दिलेल्या जबाबदारीला शंभर टक्के न्याय देऊन समाजातील सर्व प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कृषी,शिक्षण,रोजगार,आरोग्य अशा विवीध मुद्द्यांवर समाजकार्य करण्याचे काम चालू आहे.येत्या काळात आपली माण तालुका कार्यकारणीही माण तालुक्यातील प्रत्येक गावात कार्य करेल यामध्ये हॉस्पिटल,शाळा,महसुल विभाग,दहिवडीतील महाविद्यालये,परिवहन महामंडळ,पी.एम.किसान योजना इत्यादी गोष्टींमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात प्रश्न दिसून येतात. फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ते लवकरच पूर्णत्वास नेणार आहोत.लवकरच आपल्या फाउंडेशनचे संपर्क कार्यालय दहिवडी येथे करण्याचे ठरवत असून शेतकऱ्यांसाठी ज्या काही नवीन योजना येतील त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून विनामूल्य केले जाईल,असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here